कर्जतचे भूमिपुत्र केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदकाचे मानकरी

  49

कर्जत :पोलीस विभागातील कर्जतचे पोलीस उपअधीक्षक सुरेशकुमार राऊत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल या दोन्ही भूमिपुत्रांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदकाने पुण्यात सन्मानित करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक राऊत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तोरडमल हे १९९५ साली पोलीस खात्यात रुजू झाले.


गुन्ह्याच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात येते.यंदाचा केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक पुरस्कार पोलीस खात्यात सेवा देत असलेले कर्जतचे भूमिपुत्र लातूर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक सुरेशकुमार राऊत आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांना १३ जून रोजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद,पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पिंप्री चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,अतिरिक्त पोलीस महासंचालक दीपक पांडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी ऑगस्ट २०२१ साली पामबीच वाशी येथील पुलाखाली एका वृद्धेच्या कोणताही ठोस पुरावा नसताना आपले कौशल्य वापरत हत्येचा गुन्हा उघडकीस आणला होता.यासह त्यांनी बॉम्बस्फोट प्रकरणासह अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली.तर राऊत हे पुणे जिल्ह्यात कार्यरत असताना ऑक्टोबर २०२१ मध्ये शिरूर घोडनदी पोलिस स्टेशन अंतर्गत पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रवरील दरोड्याचा तपास त्यांनी यशस्वीपणे हाताळला होता.


दिवसाढवळ्या पाच दरोडेखोरांनी अग्निशस्त्राचा धाक दाखवून अडीच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली होती. पोलीस उपअधीक्षक राऊत यांनी अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने त्याचा छडा लावत अवघ्या दहा दिवसांत पाचही आरोपींना अटक करीत संपूर्ण अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. दोन्ही भूमिपुत्रांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदकाने सन्मानित करण्यात आल्याने त्याचे कर्जतमध्ये कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात

कोकणात जाणाऱ्यांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू

कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे ५, ६ आणि ७ सप्टेंबरला धावणार

पाली-खोपोली महामार्गावर जीवघेणे खड्डे

तत्काळ उपाययोजन करण्याची ग्रामस्थांची मागणी गौसखान पठाण सुधागड : पाली-खोपोली महामार्गावरील खड्ड्यांनी सुधागड

रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू

सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे ५९ गट आणि पंचायत समितीचे ११८ गण असून, गेल्या तीन वर्षांपासून

रायगड : पेणमधून यंदा दुप्पट गणेशमूर्ती परदेशात रवाना

रायगड जिल्ह्यातील गणेश मूर्तीकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यंदा ४५ हजारांहून अधिक गणेशमूर्ती