IPO News Latest : गुंतवणूकदारांसाठी आणखी एक संधी! ArisInfra Solutions Limited कंपनीचा आयपीओ परवापासून बाजारात! 'इतका' प्राईज बँड निश्चित !

  47

प्रतिनिधी: गुंतवणूकदारांना आणखी एक गुंतवणूकीची संधी चालून आली आहे. १८ जूनपासून बीएसई (BSE), एनएसई (NSE) मध्ये अरिसइन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेड (ArisInfra Solutions Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात दाखल होणार आहे. १८ ते २० जून या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ खुला राहणार आहे. २५ जूनपासून हा आयपीओ बाजारात सूचीबद्ध (Listed) होऊ शकतो. कंपनीने प्राईज बँड (Price Band) २१० ते २२२ रूपये प्रति समभाग (Share) निश्चित केली आहे. रिटेल अर्जदारांना कमीत कमी १४०७० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तर ६८ गठ्ठे (Lot) खरेदी करणे आवश्यक असेल.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जेएम फायनांशियल लिमिटेड, आयआयएफएल (IIFL) कॅपिटल सर्विसेस लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपन्या आयपीओसाठी बुक रनिंग मॅनेजर म्हणून काम पाहतील तर एमयुएफजी इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (MUFG Intime India Private Limited) कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करेल. या आयपीओतील पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Investors QIB) एकू ण  आयपीओतील ७५ % वाटा, किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) यांच्यासाठी १०%, विना संस्थात्मक गुंतवणूकदार (Non Institutional Investors NII) यांच्यासाठी १५ टक्के वाटा आरक्षित केला गेला आहे.


आर्थिक बाबीत कंपनी मोठ्या नुकसानातून बाहेर पडत नफ्याकडे गेल्याचे दिसून आले. आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीने महसूल (Revenue) ७०२.३५ कोटी इतका कमावला होता तो ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत घट त ५५७.७६ कोटींवर गेला आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीच्या तोट्यात वाढ होत तोटा १७.३० कोटी इतका होता मात्र ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मात्र कंपनीने गेल्या तिमाहीतील नुकसानाची भरपाई केली त्या तिमाहीत कंपनीला ६.५३ को टीचा नफा मिळाला होता.


२०२१ साली ArisInfra Solutions Limited या कंपनीची स्थापना झाली होती. रौनक किशोर मोरबिया, भाविक खरा, सिद्धार्थ शहा, जस्मिन शहा, भास्कर शहा, अँसस्पायर फॅमिली ट्रस्ट, प्रियांका शहा ट्रस्ट हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. कंपनीचे बांधकाम (Construction) व पायाभूत सुविधा (Infrastructure) क्षेत्रातील कंपन्यांना लागणारे मटेरियल व लागणारे वित्त पुरवठा करणारे व्यासपीठ आहे. बी टू बी (Business to Business B2B) साठी लागणारे तंत्रज्ञान कंपनी पुरवते.


१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान, कंपनीने १,४५८ विक्रेत्यांचा वापर करून आणि मुंबई (महाराष्ट्र), बेंगळुरू (कर्नाटक) आणि चेन्नई (तामिळनाडू) यासह विविध शहरांमधील ९६३ पिन कोडमध्ये २,१३३ ग्राहकांना सेवा देऊन, १,४५८ विक्रेत्यांचा (Users) चा वापर करून, १०.३५ दशलक्ष मेट्रिक टन बांधकाम साहित्य विकले आहे. ज्यामध्ये समुच्चय, रेडी-मिक्स काँक्रीट, स्टील, सिमेंट, बांधकाम रसायने आणि वॉलिंग सोल्यूशन्स या उत्पादनाचा समावेश आहे याशिवाय हे उत्पादन वितरित (Distribution) केले आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळालेल्या निधीचा वापर कंपनी भूतकाळातील देणी चुकती करण्यासाठी, कंपनीच्या खेळत्या भांडवलाची गरज (Working Capital Requirement) पूर्ण करण्यासाठी, Buildmex Inf  ra Private Limited) या आपल्या उपकंपनीत (Subsidiary) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

शाकाहारी लोकांसाठी 'ड' जीवनसत्वाची कमतरता भरून काढणारे पदार्थ

मुंबई : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी 'ड' जीवनसत्व (Vitamin D) अत्यंत महत्त्वाचे असते. शरीरातील हाडांची मजबुती,

गोविंदा फक्त माझाच! घटस्फोटाच्या चर्चांना सुनीता आहूजा यांनी दिला पूर्णविराम

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची

दक्षिण कोरियात शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी

सियोल : दक्षिण कोरियामध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर झाले आहे. मार्च २०२६ पासून हा कायदा

Horoscope: सप्टेंबर महिन्यात ‘या’ ४ राशींचे नशीब पालटणार!

नवी दिल्ली: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर २०२५ महिना अनेक र

Eknath Shinde: रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या बाईकस्वाराच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री, ताफा थांबवून केली मदत

ठाणे: आज सगळीकडे गणेशोस्तवाची धूम सुरू असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर एक अपघात घडला. एक

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुणे येथील निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना

पुणे:  गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सिल्व्हर रॉक्स, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथील निवासस्थानी महाराष्ट्र