तांत्रिक बिघाडानंतर दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलाइनर हाँगकाँगला परतले

नवी दिल्ली : हाँगकाँगहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान एआय-३१५ माघारी परतले आहे. विमानाच्या वैमानिकाला उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आला. त्यामुळे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे परत उतरले. अधिकारी सध्या तांत्रिक समस्येचे नेमके कारण काय आहे याची तपासणी करत आहेत.

बोईंग७८७-८ ड्रीमलाइनरच्या या विमानाने हाँगकाँगहून नियोजित वेळेत उड्डाण केले होते.मात्र, उड्डाणानंतर वैमानानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय आला आणि त्याने हे विमान परत माघारी फिरवण्याचा निर्णय घेतला. विमान हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे उतरल्यानंतर तांत्रिक समस्येचे स्वरूप अद्याप कळू शकलेले नाही.

एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एआय-३१५ हे विमान "तांत्रिक समस्येमुळे" हाँगकाँगला परतले आहे. दरम्यान,एअर इंडियाच्या या विमानाने दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी हाँगकाँगहूनउड्डाण केले आणि एका तासापेक्षा जास्त वेळानंतर ते खाली उतरले.
Comments
Add Comment

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.