Wednesday, January 21, 2026

Corona: धक्कादायक! आदल्या दिवशी बाळाचा जन्म, दुसऱ्या दिवशी आईचा मृत्यू

Corona: धक्कादायक! आदल्या दिवशी बाळाचा जन्म, दुसऱ्या दिवशी आईचा मृत्यू

जबलपूर: मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे एका बाळंतीणीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने शनिवारी सरकारी रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला मात्र, दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. संजय मिश्रा यांनी दिली.

डॉ. मिश्रा यांनी सांगितले की, सदर महिला मंडला जिल्ह्यातील रहिवासी होती आणि तिला आधीच फुफ्फुसाचा आजार होता. संबंधित महिला प्रसूतीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आली होती. तिने शनिवारी बाळाला जन्म दिला. यानंतर तिच्या फुफ्फुसात त्रास सुरू झाला. यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदन झाले.

यानंतर, महिलेला आयसोलेशन वार्डात शिफ्ट करण्यात आले. तेथेच तिचा मृत्यू झाला. याशिवाय, रुग्णालयात आणखी एका ७० वर्षीय वृद्धावर कोरोनाचा उपचार सुरू आहे. गेल्या एका आठवड्यात जबलपूरमध्ये ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

Comments
Add Comment