अहिल्यानगर महापालिका निवडणूक रंगतदार होणार ! पक्षांतराची चलबिचल

  61

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या काही दिवसांत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. २००३ साली स्थापन झालेल्या महानगरपालिकेवर आतापर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचे वर्चस्व राहिले असले, तरी आता राजकीय चित्र झपाट्याने बदलत चालले आहे.



पूर्वीचे दोन प्रमुख पक्ष आता चार गटांमध्ये विभागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत उभी फूट पडल्याने, शिंदे गट,ठाकरे गट,अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा वेगवेगळ्या गटांनी निवडणुकीत आपले बळ आजमावण्याची तयारी केली आहे. यासोबतच भाजपने शहरात मजबूत पाय रोवले आहेत. भाजपच्या नव्या नेतृत्वाखाली, विशेषतःअनिल मोहिते यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्यापासून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.महापौरपदावर सर्वांची नजर


महापौरपद कोणाकडे जाणार? हा प्रश्न सध्या सर्व राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. आतापर्यंत शिवसेनेचे सर्वाधिक चार महापौर झाले आहेत, त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे तीन, तर काँग्रेस व भाजपला प्रत्येकी एकदाच संधी मिळाली आहे. मात्र, या वेळी महायुत्ती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत झाली, तर सत्तेचे गणित कोणाकडे झुकणार याकडे साऱ्या शहराचे लक्ष लागले आहे.किंगमेकर कोण?
या निवडणुकीत पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील,आ.जगताप आणि माजी आ.कर्डिले हे तिघेही पुन्हा किंगमेकरच्या भूमिकेत दिसतील, अशी शक्यता आहे. यापूर्वी १५ नगरसेवकांवर आधारित मताधिक्य मिळवून भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले होते, त्यामुळे कमी मताधिक्य असूनही योग्य संधी साधणाऱ्याला महापालिकेचा गड जिंकण्याची संधी असते,हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.नव्या प्रभागांची शक्यता राज्यातील प्रभागरचना हा चर्चेचा विषय ठरतो आहे.भाजपकडून प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक असावेत अशी मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय मतदारसंख्येच्या वाढीमुळे दोन ते तीन नवीन प्रभाग तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक नवोदित नेत्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.पक्षांतराची चलबिचल निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षांतराचे वारे अधिक वेगाने वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्तेच्या समीकरणात आपली भूमिका भक्कम करण्यासाठी अनेक स्थानिक नेते आणि माजी नगरसेवक फिल्डिंग लावत आहेत.



२०१८ ची पक्षीय आकडेवारी



  • शिवसेना (एकत्रित) ... २३

  • राष्ट्रवादी (एकत्रित).... १९

  • भाजप १५

  • काँग्रेस ५

  • वसप. ४

  • सपा. १

  • अपक्ष १

  • एकूण ६८


आतापर्यंतचे महापौर



  • भगवान फुलसौंदर (शिवसेना).२००३

  • संदीप कोतकर (काँग्रेस) २००६

  • संग्राम जगताप (राष्ट्रवादी) २००८

  • शीला शिंदे (शिवसेना). २०११

  • संग्राम जगताप (राष्ट्रवादी). २०१३

  • अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी) २०१५

  • सुरेखा कदम (शिवसेना) २०१६

  • बाबासाहेब वाकळे (भाजप) २०१८

  • रोहिणी शेंडगे (शिवसेना). २०२१

Comments
Add Comment

पालकमंत्री नितेश राणेंची मटका अड्ड्यावर धाड! घेवारी बुकीचे धाबे दणाणले, ११ जणांना अटक

कणकवली: कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका बस्तान मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका गोळा करणारा

रायगड : पेणमधून यंदा दुप्पट गणेशमूर्ती परदेशात रवाना

रायगड जिल्ह्यातील गणेश मूर्तीकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यंदा ४५ हजारांहून अधिक गणेशमूर्ती

पुण्यात सिंहगडावर पर्यटनाला आलेला युवक अद्याप बेपत्ता! नेमकं काय झालं?

पुणे : सध्या पावसाळी पर्यटनाला चेव फुटला असून, अनेक पर्यटनप्रेमी गड किल्ल्यांवर तसेच निसर्सरम्य ठिकाणी जात आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच होणार सुरु, सिडको अधिकाऱ्यांची मोठी माहिती

बहुचर्चित नवी मुंबईत तयार होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ आता लवकरच सुरू होणार आहे. या विमानतळावरून सुरुवातीला

पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट

मुंबई: राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD) आणि

राज्यात आजपासून काही भागात पावसाचा जोर ओसरणार

काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत आज गुरुवारी काही भागात