कृत्रिम तलावांची वाढवणार संख्या

  49

गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांसोबत मनपाची बैठक


विरार : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात यावर्षी गणेशोत्सवासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात येईल, तसेच कृत्रिम तलावासाठी नागरिकांकडे जागा उपलब्ध असल्यास त्याबाबतही विचार केला जाईल असे मत असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांनी व्यक्त केले. मनपा मुख्यालयात महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांच्यामध्ये गणेशोत्सव संदर्भात नुकतीच बैठक पार पडली.



मागील वर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिकेने एकूण १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३३ हजार ७०१ मूर्तींचे विसर्जन झाले होते, यापैकी एकूण १९ हजार ८५३ मूर्तींचे विसर्जन हे पालिकेने निर्मिती केलेल्या कृत्रिम तलाव, फिरते हौद यांमध्ये झाल्याची माहिती उप-आयुक्त अर्चना दिवे यांनी दिली. वसई विरार शहर हे तलावांचे शहर असून पीओपीच्या मूर्ती अशा नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जन करून तलाव दुषित न करण्याचे आवाहन अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी केले. नागरिकांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती आणाव्यात त्याचप्रमाणे मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी, थर्मोकोलचा उत्सवात कमी वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. उच्च न्यायालयाने पीओपी गणेशमूर्ती निर्मिती संदर्भात दिलेल्या निर्देशांबाबत आयुक्त पवार यांनी माहिती दिली. जास्तीत जास्त शाडूच्या मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी मूर्तीकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणे बाबत महापालिका प्रयत्नशील आहे असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. बैठकीचे संचालन सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी केले.


निःशुल्क परवानग्या एकाच ठिकाणी


गणेशोत्सव मंडळांसाठी महानगरपालिका, पोलीस विभाग, महावितरण यांची एकाच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने नि:शुल्क परवानग्या देण्यास लवकरच सुरुवात करण्यात येईल. मंडपात विद्युत कनेक्शन घेतेवेळी महावितरणाच्या सूचनेनुसार योग्य ती दक्षता घ्यावी, मिरवणुकीच्या वेळी उंचीमुळे विद्युत हायटेन्शन वायरला धक्का लागून अपघात होऊ नये याबाबतची दक्षता मंडळामार्फत घेण्यात यावी यासाठी कमी उंचीच्या गणेशमूर्ती आणण्यावर मंडळांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले.




  • मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी.

  • तलाव दूषित न करण्याचे आवाहन.

  • थर्मोकोलचा कमी वापर करा.

  • शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती जास्त प्रमाणात आणाव्यात

Comments
Add Comment

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने

घोडबंदर ते तलासरी महामार्ग धोकादायक स्थितीत

तातडीने लक्ष द्यावे अशी खासदारांची मागणी वाडा : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८

प्रियकरासोबत रंगेहाथ सापडल्याने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

घरातच गाडले, भावानेच घरातील फरशा बदलल्या नालासोपारा : नालासोपारा येथे प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले गेल्यानंतर

रोज ५० लाख लिटर पाणी, तरी टँकरवर मदार

महापालिका करणार पाण्याचा हिशोब विरार : टँकरमाफीयांना फायदा व्हावा म्हणून महापालिकेकडून होत असलेला पाणीपुरवठा