Saturday, August 23, 2025

‘हल्ले थांबवा नाही तर तेहरानला आग लावू’

‘हल्ले थांबवा नाही तर तेहरानला आग लावू’

इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा इराणच्या खोमेनींना इशारा

नवी दिल्ली : १३ जून रोजी इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा आणि लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. यात अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि वैज्ञानिक मारले गेले. त्यानंतर खवळलेल्या इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स सोडले. यामुळे इस्रायलमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री कात्झ यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांना इशारा दिला आहे. इराणने हल्ले थांबवावेत नाही तर तेहरानला आग लावू, असा धमकी वजा इशारा कात्झ यांनी दिला आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पेटला आहे. इस्रायलने हल्ले केल्यानंतर इराणने मिसाईल्स आणि ड्रोन्स इस्रायलवर डागले. तेल अवीव इतर काही शहरात मिसाईलमुळे नुकसान झाले आहे. इराणकडून हल्ले सुरूच असून, इस्रायलचे संरक्षण मंत्री कात्झ यांनी इराणला इशारा दिला आहे.

इराणसोबतचा लष्करी संघर्ष वाढल्यानंतर इस्रायलमध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला आयडीएफ (इस्रायल डिफेन्स फोर्सेस)चे चीफ ऑफ स्टाफ एयार जामीर, मोसादचे प्रमुख डेव्हिड बारनेआ आणि इतर लष्करी अधिकारी उपस्थित होते. संरक्षण मंत्री कात्झ म्हणाले, इराणचा हुकूमशाह स्वतःच्याच नागरिकांना ओलीस ठेवू लागला आहे आणि अशी परिस्थिती तयार करत आहे. ज्यात विशेषतः तेहरानच्या नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागेल. कात्झ यांनी अयातुल्ला खोमेनी यांना धमकी वजा इशारा देत म्हटले की, जर खोमेनी इस्रायलच्या नागरिकांवर मिसाईल्स डागत राहिले, तर आम्ही तेहरानला आग लावू. आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, मागील रात्रीपासून आतापर्यंत इराणने इस्रायलवर तब्बल २०० बॅलेस्टिक मिसाईल डागल्या आहेत. यात बहुतांश मिसाईल्स इस्रायलच्या एअर डिफेन्सने हवेतच नष्ट केल्या. पण, अंदाजानुसार २५ टक्के मिसाईल्स इंटरसेप्ट झाल्या नाही. त्या पाडण्यात अपयश आले आणि काही मोकळ्या जागेत पडल्या. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, इराणच्या काही मिसाईल्स चकमा देऊन इस्रायलमधील नागरी भागात कोसळल्या. तेल अवीव, रमात गन आणि रिशोल लेजिओने या शहरात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे इस्त्रायलची हानी इराणच्या २५ टक्के मिसाईल पाडण्यात इस्त्रायल अपयशी
Comments
Add Comment