Monday, October 6, 2025

ज्ञान तेथे सन्मान

विद्याविभूषितांचे गोडवे गातात सारे त्यांच्याकडे ज्ञानाचे असती खळाळते झरे राजा असतो त्याच्या राज्यात पूजनीय विद्वान मात्र साऱ्या विश्वात वंदनीय विद्वानास ठाऊक ज्ञान नाही वाया जात ज्ञानासारखे पवित्र नाही काही जगात जे जे ठाऊक आपणास ते ते वाटून द्यावे ज्ञान दिल्याने वाढते लक्षात पक्के ठेवावे पैसाअडका धनदौलत चोरीस जाऊ शकेल ज्ञानाची चोरी सांगा कशी कोण करेल? ज्ञानाची अक्षरपाटी ज्याची राहील कोरी अज्ञानामुळे आयुष्य दुःखाच्या जाई दारी अज्ञानामुळेच पुढे वाढत जाते अंधश्रद्धा प्रगतीच्या मार्गात मग येती अवघड बाधा म्हणूनच ज्ञानाची गंगोत्री आपण सारे होऊ ज्ञानाचे दीप लावूनी अज्ञानाला पळवून लावू
Comments
Add Comment