अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन दिसल्यास कारवाईचे निर्देश

शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची प्रक्रिया, शिजवणे वेगळी असावी


मुंबई : अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत, अन्न सुरक्षा व मानके नियमन, २०११ मधील अनुसूची ४ मधील सूचनांनुसार शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची तयारी, प्रक्रिया, शिजवणे वेगळी असावी. शाकाहारी अन्नपदार्थाची मांसाहारी अन्नपदार्थापासून प्रक्रियात्मक व साठवणीच्या टप्प्यावर स्पष्टपणे वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर परवाना रद्द, दंड आकारणे किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.


सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षेबाबत असलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.  अन्न व औषध प्रशासनामार्फत गतवर्षी राज्यातील ३० हजार अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण  देण्यात आले आहे तर या वर्षी एक लाख अन्न व्यवसायिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीर बाब नसून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. नियमांच्या पालनात दोषी अन्न आस्थापनाना त्वरित नोटीस, कारवाई व आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी कळविले आहे. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र आणि भारतीय अन्न व सुरक्षा आणि मानके प्राधिकरण   यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नसुरक्षा व प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यभर विविध प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा व जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.


अन्न व औषध प्रशासनात एकूण नवीन १८९ अन्न सुरक्षा अधिकारी ७ जून २०२५ रोजी  रुजू झालेले असल्याने अन्न आस्थापना तपासणी संख्या निश्चितच वाढणार आहे. राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व उपाहारगृहांमध्ये नियमित तपासण्या केल्या जात असून तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. अन्न भेसळी संदर्भात नागरिकांनीही हेल्पलाइनच्या माध्यमातून तक्रार नोंदवावी.

Comments
Add Comment

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)

तुम्हाला वारंवार Spam कॉल येतात का? तर आता नो टेन्शन कारण...

आता अनोळखी नंबरसह मोबाईलवर दिसेल कॉल करणाऱ्याचं नाव मुंबई : दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल होत

स्टारलिंकची भारतात एंट्री, मुंबईत होणार डेमो रन

मुंबई : एलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक कंपनी भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ३०

देशभरात १ नोव्हेंबरपासून आधार, बँकिंग व एलपीजीवर नवे नियम होतील लागू

मुंबई : देशभरात १ नोव्हेंबरपासून अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन