केदारनाथ दुर्घटनेनंतर चार धाममध्ये हेलिकॉप्टर सेवेवर बंदी

  74

देहरादून : चार धाम यात्रेदरम्यान उपलब्ध असलेल्या हेलिकॉप्टर सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ येथे आज (दि.१५) झालेल्या हेलिकॉप्टर अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यूकेएडीए आणि डीजीसीएने पुढील आदेश येईपर्यंत या सेवेवर बंदी घातली आहे. यासोबतच, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात हेलिकॉप्टर ऑपरेशन्सबाबत एसओपी तयार करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.


उत्तराखंडमधील केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताला गांभीर्याने घेत मुख्यमंत्री धामी यांनी हेलिकॉप्टर ऑपरेशन्सबाबत कडक सूचना जारी केल्या आहेत. राज्यात हेलिकॉप्टर सेवांच्या संचालनासाठी एक कठोर एसओपी तयार करावी, ज्यामध्ये हेलिकॉप्टरच्या तांत्रिक स्थितीची संपूर्ण तपासणी करणे आणि उड्डाणापूर्वी अचूक हवामान माहिती घेणे अनिवार्य करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना तांत्रिक तज्ञांची एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत, जी हेलिकॉप्टर ऑपरेशन्सच्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षितता पैलूंचा सखोल आढावा घेऊन एसओपी तयार करेल. ही समिती हेलिकॉप्टर सेवेचे संचालन पूर्णपणे सुरक्षित, पारदर्शक आणि निर्धारित मानकांनुसार आहे याची खात्री करेल.


हेलिकॉप्टर अपघातांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने या प्रकरणी अहवाल सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ही समिती राज्यातील हेलिकॉप्टर अपघातांची चौकशी करेल. या चौकशीत रविवारी (दि.१५) झालेल्या अपघाताचा तसेच जुन्या घटनांचा समावेश असेल. ही समिती प्रत्येक घटनेची कारणे सखोलपणे तपासेल आणि दोषी व्यक्ती किंवा संस्थांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करेल. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील हेलिकॉप्टर सेवांचे महत्त्व तीर्थयात्रा, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवांसाठी खूप मोठे आहे, त्यामुळे यामध्ये सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.


दरम्यान, रविवारी(दि.१५) अपघातग्रस्त झालेलं हेलिकॉप्टर तीर्थयात्रींना परत घेऊन गुप्तकाशीला परतत होतं. गौरीकुंडच्या धुरी खरकजवळ हे हेलिकॉप्टर जंगलात कोसळलं. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळी सुमारे ५ वाजता घडला. हेलिकॉप्टर आर्यन हेली एव्हिएशन कंपनीचं असल्याचं सांगितलं जात आहे. गौरीकुंडच्या वरच्या भागात गवत कापत असलेल्या नेपाळी मूळच्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली. त्यानंतर बचाव मोहिम सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री धामी यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या