शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांना इलेक्शन ड्युटी

पालिकेच्या २,१०० शिक्षकांना १५ जूनपूर्वीच हजर राहण्याचे आदेश


मुंबई (प्रतिनिधी) : शाळा सुरू होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे 'मिशन अॅडमिशन' मोहिमेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदार यादी पुनरीक्षणासाठी मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ जून २०२५ पूर्वीच शिक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत.


यामुळे आधीच शिक्षक कमतरतेचा सामना करणाऱ्या महापालिका शाळांमध्ये आणखी गोंधळ वाढेल. शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. १२ जून रोजी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, मुंबई शहर आणि उपनगर विभागांत एकूण ८ हजार कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी आवश्यकता आहे.


त्यापैकी २,१०० कर्मचारी शिक्षण विभागातून, तर ४,९०० कर्मचारी आरोग्य विभागातून घेतले जाणार आहेत. बीएलओ आणि बीएलओ सुपरवायझर या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी ही नियुक्ती केली जाणार आहे.मुंबई शहर जिल्ह्यासाठी ४०० आणि उपनगर जिल्ह्यासाठी १,७०० शिक्षकांची मागणी करण्यात आली आहे.



पूर्णवेळ कार्यरत राहणार


शिक्षण अधिकान्यांनी ही नियुक्त शिक्षकांची नावे १५ जूनपूर्वी संख्या निश्चित करून, जिल्हाधिकारी मुंबई शहर आणि उपनगर कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हे शिक्षक निवडणूक विभागात पूर्णवेळ कार्यरत राहतील, असेही या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. हे आदेश महापालिकेचे सामान्य प्रशासन अधिकारी स. तु. शिरवाडकर यांनी जारी केले आहेत. शिक्षक संघटनानी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.


महापालिकेच्या शाळामध्ये आधीच ८०० पेक्षा अधिक शिक्षकांची कमतरता आहे. शाळा सुरू होण्याच्या काळारा शिक्षकांना इतरत्र पाठवणे म्हणजे विद्याथ्यांचे नुकसान करण्यासारखे आहे. - शरद सिंग, अध्यक्ष, बृहन्मुंबई शिक्षक सभा


संबंधित पत्राबाबत अद्याप मला भेट माहिती नाही. पत्र कार्यालयात आले असेल, पत्र पहिल्यानंतरच मी सविस्तर बोलू शकेन. - राजेश ककाळ, शिक्षणाधिकारी,

Comments
Add Comment

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण