सायबर गुन्ह्यात कंपनीचे नुकसान

अ‍ॅड. रिया करंजकर


आधुनिकीकरण हे झपाट्याने होत चाललेले आहे. याचे जेवढे फायदे आहेत तेवढ्याच पटीने त्याचे तोटेही आहेत. पूर्वी माणसांना पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागायचं. स्लीप भरावी लागायची. मग पैसे मिळायचे. मोबाईल आल्यानंतर ऑनलाइन गोष्टीमुळे बसल्या जागेवर आपण लगेच पैशांची देवाण-घेवाण करू शकतो. पूर्वी पोस्टाच्या पत्रामुळे आपल्याला एकमेकांची खुशाली कळत होती, पण त्यानंतर टेलिफोन, मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉपसारख्या अत्याधुनिक गोष्टीमुळे आपल्याला बसल्या जागेवर जगातल्या सगळ्या गोष्टी समजू लागल्या. माणसांना त्यामुळे फायदा होऊ लागला. त्यामुळे जगाची आर्थिक परिस्थिती बदलत चालली पण तेवढेच तोटेही लोकांना सहन करावे लागले. मोबाईल पेमेंट, इंटरनेट पेमेंट किंवा गुगल पे यांसारख्या पैशांच्या देवाण-घेवाण होणाऱ्या गोष्टीमुळे लोकांचा वेळ आणि श्रमाची बचत झाली असली तरी धोके मात्र वाढले. यात अनेक लोकांची आर्थिक फसवणूक झाली.



प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या देशांचे छोट्या-मोठ्या कंपन्या या कार्यरत असतात किंवा त्या देशांमध्ये त्यांचे प्रतिनिधी हे काम बघत असतात. जपानची प्रसिद्ध कंपनी ही वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या प्रतिनिधींमार्फत आपल्या प्रोडक्टचं काम बघत असे. जपानची कंपनी म्हटल्यावर त्याचा मालही त्याच पद्धतीचा असायचा. त्याच्यामुळे या कंपनीच्या मालाला खरेदीदार जास्त होते. ही कंपनी त्यामुळे प्रॉफिटमध्ये होती. नावारूपाला आलेली कंपनी. त्याच्यामध्ये जपानमधील एक व्यक्ती प्रत्येक देशात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करून काम करत असे आणि त्या देशातले आर्थिक व्यवहारी तीच व्यक्ती बघत असे. संगस्वी हा जपानी माणूस भारतातील जपानच्या कंपनीचा व्यवहार बघत होता. त्याच्याकडे आर्थिक व्यवहारही होते. या कंपनीशी भारतातील अनेक ग्राहक जोडले होते आणि त्यांच्याशी या कंपनीची देवाण-घेवाण चालत होते. माल पाठवला जाईल त्यावेळी मेलवरून सर्व माहिती दिली जात असे. एवढंच नाहीतर आर्थिक माहितीचे मेल केले जात होते. संगस्वी मेलवरून सगळ्या गोष्टींवर लक्ष
ठेवून होता.


एक दिवस लॅपटॉपमध्ये कंपनीचे मेल बघत असताना एका सर्वात जुन्या ग्राहकाचा मेल आला होता. त्या मेलमध्ये असं लिहिलेलं होतं की, तुमचा माल पोहोचलेला आहे आणि एवढी रक्कम कंपनीकडून येणे बाकी आहे. संगस्वी याने तो मेल बघितला. त्याची रक्कम पाठवायला पाहिजे म्हणून त्याने लगेचच त्या मेलची डिटेल घेऊन ७५ लाख पाठवूनही दिले. थोड्यावेळाने संगस्वीच्या लक्षात आले की, जे माल पाठवतात ते मेलसोबत फोनदेखील करतात. पण याने तसं काहीच केले नाही. म्हणून संगस्वीने लगेचच त्या ग्राहकाला फोन केला असता त्या ग्राहकाने मी मेल केलेला नाही आणि मालाबद्दल आपलं काहीच बोलणं झालं नाही असं सांगितलं. त्यावेळी संगस्वीला वाटले की, आपण सायबर क्राईममध्ये अडकलो आहोत. त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला आणि त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. ज्या मेलने तो मेसेज आला तो चेक केल्यावर असं समजलं की त्या ग्राहकांना मेल केलेलाच नव्हता हे पोलिसांच्या लक्षात आल्यावर सायबर क्राईम यांनी ते ७५ लाख ज्या अकाऊंटवर पाठवले होते ते अकाऊंट बँकेला सांगून फ्रीज करण्यात आले.सगस्वी याच्या लवकर लक्षात आल्यामुळे या गोष्टी पटकन घडून ते अकाऊंट बंद करण्यात आले होते.


या सर्व गोष्टी त्याच्या हुशारीमुळे घडल्या पण आता ती रक्कम परत घेण्यासाठी त्याला कोर्टात जावं लागलं. कारण रिटर्न ऑफ प्रॉपर्टी ही कोर्टामधूनच होते आणि आता तो कोर्टाच्या फेऱ्या घालत आहे. हे त्याच्या हुशारीमुळे जरी घडलं असलं तरी कंपनीचं कितीतरी मोठं नुकसान झालेलं होतं. ते भरून काढण्यासाठी थोडा वेळ जाणारच होता. पण क्राईम सायबर गुन्हेगार हे लोकांना कशाप्रकारे फसवतात त्याचे अनेक प्रकार हे आधुनिकीकरणामुळे होत आहेत. कारण काही लोकांना, वयस्कर, अशिक्षित असलेल्या माणसांना अँड्रॉइड मोबाईल वापरण्याची सवय नसल्यामुळे किंवा काही गोष्टींचं सखोल ज्ञान नसल्यामुळे ते या सायबर गुन्ह्यात फसले जातात.

Comments
Add Comment

डाकिया डाक लाया...

डॉ. साधना कुलकर्णी पत्रव्यवहार हा अनेकांच्या हृदयातला एक हळवा, नाजूक आणि भावनाप्रधान असा कोपरा असतो. आजही

कविवर्य मंगेश पाडगावकर

कोकणी बाणा : सतीश पाटणकर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव आदराने घेतले

सामाजिक एकाकीपणा आणि आधुनिक समाज

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजच्या धावपळीच्या युगात, जेव्हा आपण इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडलेलो आहोत, त्याच वेळी

‘विकत घेतला शाम...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सुमारे ६५ वर्षांपूर्वी आलेला एक सिनेमा आजही अनेकांच्या लक्षात आहे. राजाभाऊ

श्रीहरीचा अंश असलेल्या पृथूची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ध्रुवानंतर आठव्या पिढीत अंग नावाचा राजा झाला. त्याच्या पत्नीचे नाव सुनिथा

श्री गणेशाचे स्वरूप

अष्टसिद्धी विनायक तेजोमय चैतन्यरूप  ऊर्जेचा स्रोत अद्भुत ओंकार हे स्वरूप  वरील चार ओळींमधून मी गणेशाचे स्वरूप