ट्रम्प-मस्क दिलजमाई; दोघांच्या गरजेची...

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बिलेनियर उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात मतभेद झाले आणि ते पेल्यातील वादळ ठरले. दोघांनीही काल समझोता केला आणि एक बिलेनियर उद्योगपती आणि अमेरिकन अध्यक्ष यांच्यातील समझोता अखेर अस्तित्वात आला. आता त्यांच्यात समझोता झाला आहे तेव्हा त्यांच्या संबंधांकडे पाहिले असता असे लक्षात येईल की, ट्रम्प यांना अमेरिकन अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठी मस्कच जबाबदार होते आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच ट्रम्प अध्यक्षपदाच्या आसनावर विराजमान झाले. दुसऱ्या टर्मसाठी ट्रम्प जेव्हा तयारी करत होते तेव्हा बिलेनियर उद्योगपतींनी त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका साकारली यात काही शंका नाही. जसे की, अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्या निवडीत तेव्हाचे उद्योगपती ज्यांचे नाव अद्यापही गुलदस्त्यात आहे त्यांच्यामुळे ट्रुमन अध्यक्ष होऊ शकले.


त्यानंतर आता ट्रम्प आणि मस्क यांच्यात असेच नाते आहे. अर्थात ट्रम्प आणि ट्रुमन यांच्यातील फरक लक्षणीय आहे. ट्रुमन इतके कधीही तिरस्करणीय नव्हते जितके ते ट्रम्प आहेत. पण ते असो. २०२४ मध्ये ट्रम्प आणि मस्क यांच्यातील नातेसंबंध यांचे अधोरेखित झाले होते जेव्हा मस्क यांनी ट्रम्प यांच्या मोहिमेत न भूतो न भविष्यती अशी भूमिका बजावली. तेव्हापासून ट्रम्प आणि मस्क यांच्यातील जवळीक वाढली आणि व्हाईट हाऊस यांच्यात तिचा बोलबाला झाला, पण या त्यांच्या संबंधात गेल्या आठवड्यापासून तणाव सुरू झाला आणि दोघांत संघर्षाचे खटके उडू लागले. जनतेतून टीका तर होतच होती, पण त्यानंतर दोघांत तीव्र खटका उडाला.


गेल्या आठवड्यात ट्रम्प आणि मस्क यांच्यात भागीदारी होती, ती तणावपूर्ण होती आणि त्यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील तणावाचे रूपांतर गेल्या आठवड्यात बाचाबाचीत झालेले पाहिले. ७८ वर्षीय ट्रम्प हे माझ्याशिवाय निवडणूक जिंकू शकले नसते अशी मल्लिनाथी मस्क यांनी केली, तर ट्रम्प हे पूर्ण कृतघ्न आहेत असा आरोप त्यानी जाहीररीत्या केला. एक जगप्रसिद्ध उद्योगपती आणि दुसरा अमेरिकेचा ताकदवान सर्वात मोठा शक्तीशाली अमेरिकन अध्यक्ष यांच्यातील या संघर्षाचे परिणती काय होणार यावर जग अंदाज लावत बसले. आता जग थोडे-फार सावरले असले तरीही या संघर्षाचा परिणाम चांगला होणार नाही हे दोघांनाही माहीत आहे. ट्रम्प यांनी मस्क यांच्यात अवाढव्य उद्योगजगताला धक्का लावण्याची धमकी दिली आहे आणि मस्क यांच्या काळजाचा ठोकाच त्यामुळे चुकला, त्याने कदाचित मस्क यांना आपली धमकी मागे घेऊन ट्रम्प यांच्याशी जुळवून घ्यावे लागले असावे.


या भांडणाची अपरिहार्य परिणती म्हणजे ट्रम्प यांनी आपल्याकडील सरकारी वरदहस्त मस्क यांच्या कंपन्यांना काढून घेतला आणि परिणामी मस्क यांच्या टेस्लाच्या किमती १४ टक्क्यांनी गुरुवारीच कोसळल्या. अर्थात ही एकतर्फी घोषणा नव्हती, तर मस्क यांनीही मग ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची धमकी दिली. या युद्धात मस्क हे युद्ध जिंकू शकणार नाहीत कदाचित पण ते ट्रम्प यांना धडा शिकवू शकतात आणि आपली किंमत वसूल करू शकतात. ट्रम्प यांना याची जाणीव असावी, पण त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की, मस्क यांनी आधीच आपले मंत्रिमंडळ सोडून जायला हवे होते, पण आता दोघांनाही आपापली चूक कळून आली आहे आणि त्यामुळे दोघांनीही आपल्या समशेरी म्यान केल्या आहेत. यात विजय कुणाचा झाला अथवा कुणाचा पराभव झाला हे ज्याच्या त्याच्या भूमिकेप्रमाणे ठरेल.


ट्रम्प आणि मस्क यांनी शक्तीशाली पण अनौपचारिक, पण अशक्य वाटणारी आघाडी उघडली होती, आता ती पुन्हा मजबूत झाली आहे असे वाटते, पण हे किती दिवस चालेल याचा काहीच अंदाज नाही, कारण दोघेही अहंमन्य आणि अहंकारी नेते आहेत. त्यात दोघांचेही इगो आपसात टकराव देत असतात. त्यामुळे किती दिवस हे तात्पुरते पॅचअप चालेल हे काही सांगता येत नाही. आता हा प्रश्न आहे की, हा संघर्ष कुठे जाणार आहे. काँग्रेसच्या रिपब्लिकन खासदारांना ट्रम्प यांच्या पाठीशी सदस्य ठेवणे अवघड जाणार आहे.


ट्रम्प यांनी अगोदरच मस्क यांच्या सरकारी कंत्राटांना धक्का देणे सुरू ठेवले आहे, तर मस्क यांनी आपल्याशी शत्रुत्व करतील त्यांना कव्हर देणे बंद केले आहे. त्याचा फटका ट्रम्प यांच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना बसेल. दरम्यान डेमोक्रेट्स बाजूला पडले आहेत. काहीजण मस्क यांचे स्वागत करण्यास तयार आहेत कारण मस्क यांनी त्यांच्या पक्षाला मदत केली आहे आणि त्यांना पुन्हा ते आपल्या पक्षात वळवून घेण्यास तयार आहेत, पण एकूण डेमोक्रेट्स मात्र विभागलेले आणि द्विधा मनस्थितीत आहेत. काही राजकीय तज्ज्ञांच्या मते हा झिरो सम गेम आहे. म्हणजे कोणत्याही क्षणी ट्रम्प यानी असे काही पाऊल उचलले ते रिपब्लिकन पक्षाला दुखावेल.


सध्या मात्र डेमोक्रेट्स लांबून या दोन दिग्गजांमधील लढाई पाहतील आणि कुणालाही साथ देणार नाहीत अशी स्थिती आहे. अर्थात या युद्धाचा एक वाईट परिणाम समोर आला आहे तो म्हणजे नासाच्या स्पेस लीडरशिपच्या बाबतीत, नासाची अंतराळ मोहीम धोक्यात आली आहे आणि मस्क यांनी आता आपला मोहिमेला असलेला आर्थिक पाठिंबा काढून घेण्याची शक्यता असल्याने ही मोहीमच संकटात सापडली आहे.


त्यामुळे अमेरिकेची अंतराळ विज्ञानातील झेपही. शाब्दिक युद्धाने सुरुवात झालेली असली तरीही आता तिची परिणती युद्धबिंदूत झाली आहे आणि अमेरिकन अंतराळ विज्ञान आणि एक्सप्लोरेशन यांना त्याचा जबरदस्त फटका बसला आहे. या आगीत ट्रम्प यांनी तेल ओतले आहे आणि मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीशी असलेले अंतराळ करार मोडीत काढण्याची शक्यता आहे त्यामुळे ट्रम्प यांना जसा फटका बसला आहे तसाच तो मस्क यांनाही बसला आहेच. आता पुढे काय होणार ते दोघेही सांगू शकत नाही.

Comments
Add Comment

China Taiwan : तैवानची कोंडी

चीनच्या सततच्या गस्तीमुळे तैवानच्या लष्कराला २४ तास हाय-अलर्टवर राहावे लागते. परिणामी त्यांच्या सैनिकांमध्ये

मोशी : निष्काळजीपणाचे बळी

मोशी कचरा डेपोत घडलेली प्रशासकीय हलगर्जी आणि भ्रष्टाचाराची भीषण परिणती आठ निष्पाप कामगारांच्या मृत्यूच्या

Cricket Update : निराशाजनक पर्व

कर्णधार श्रेयस अय्यरसाठी हे अपयश एका अग्निपरीक्षेसारखे आहे. आगामी झिम्बाब्वे मालिकेपूर्वी भारतीय संघाला केवळ

Development vs Environment : विकास, की विकासाचा ऱ्हास?

‘प्रजा’ संस्थेच्या २०२६ च्या अहवालातून मुंबईतील कचरा, प्रदूषण, वाहतूक आणि इतर नागरी समस्यांचे गंभीर चित्र समोर

Konkan Folk Art : कोकणातल्या लोककलेला राजाश्रय

सिंधुदुर्गातील दशावतार, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, रायगड जिल्ह्यातील आदिवासी तारफा नृत्य या सर्वांची

लँडमार्क करार

भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाचा आणि इंडो-पॅसिफिकमधील वाढत्या रणनीतिक भूमिकेचा ठसा उमटवत पंतप्रधान