Oswal Pumps IPO GMP: पहिल्याच दिवशी विना संस्थात्मक गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद 'इतक्या' टक्क्याने सबस्क्रिप्शन

प्रतिनिधी: ओसवाल पंप्स लिमिटेड (Oswal Pumps Limited) कंपनी आयपीओला (IPO) पहिल्या दिवशी ४२ टक्क्याने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. पहिल्या दिवशी ४२% बिडींग झाल्या आहेत. विशेषतः विना संस्थात्मक गुंतवणूकदार (Non Institutional Investors NII) कडून समाधानकारक प्रतिसाद या आयपीओला पहिल्या दिवशी मिळाला आहे. विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून या आयपीओला ७९% सबस्क्रिप्शन मिळाले आहे. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून कंपनीला ८% सबस्क्रिप्शन मिळाले आहे. कंपनीकडून ५८४ ते ६१४ रुपये प्राईज बँड निश्चित करण्यात आला होता.


कंपनीकडून ८९० कोटींच्या समभागांचा फ्रेश इश्यू (Equity Shares) लोकांना गुंतवणूकीसाठी ठेवण्यात आला होता तर ८१ लाखांचे समभाग ऑफर फॉर सेल (OFS) म्हणून ठेवण्यात आले होते. एकूण १३८७.३४ कोटींचा हा आयपीओ होता. एनएसई (NSE) माहितीनुसार या आयपीओसाठी ६७८३५५२ बिड प्राप्त झाल्या होत्या.ऑफर फॉर सेलसाठी १६२१२९८० शेअर्सचे बिडिंग आयपीओला मिळालेले आहे.



कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आयपीओतील निधीचा वापर भांडवली खर्च (Capital Expenditure), नवीन प्रकल्प तसेच दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. १७ तारखेला गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची शेवटची संधी असेल १३ ते १७ जून कालावधीत हा आयपीओ सर्वसामान्यांसाठी खुला असणार आहे.


२००३ मध्ये स्थापन झालेली ओसवाल पंप्स लिमिटेड ही पंपांची उत्पादक आणि वितरक आहे. ही कंपनी घरगुती, कृषी आणि औद्योगिक अनुप्रयोगांसाठी विविध प्रकारच्या उत्पादनांची ऑफर देते ज्यामध्ये सौर पंप, सबमर्सिबल पंप, मोनो ब्लॉक पंप, प्रेशर पंप, सांडपाणी पंप, इलेक्ट्रिक मोटर्स, सबमर्सिबल वाइंडिंग वायर आणि केबल्स आणि इलेक्ट्रिक पॅनेल यांचा समावेश आहे.


 
Comments
Add Comment

सतीश शहांच्या निधनानंतर अभिनेता सुमित राघवनला अश्रू अनावर

मुंबई : चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे