NEET 2025 निकाल जाहीर; महाराष्ट्रातून १.२५ लाख विद्यार्थी पात्र, कृष्णांग देशात तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई : नीट-यूजी २०२५ (NEET-UG 2025) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा महाराष्ट्रातून १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मात्र, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत १७ हजारांनी घटली आहे.


या वर्षी राज्यातून २ लाख ४८ हजार २०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ४२ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेला हजेरी लावली. त्यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.


सर्वोच्च १० गुणवंतांमध्ये महाराष्ट्राच्या कृष्णांग जोशीने देशपातळीवर तिसरा क्रमांक पटकावला आहे, तर आरव अग्रवालने दहावा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय, मुलींच्या टॉप-२० यादीतही महाराष्ट्राच्या विद्यार्थिनींनी आपली चमक दाखवली. सिद्धी बढे (३री), ऊर्जा शहा (५वी) आणि इश्मित कौर (१२वी) यांनी आपले नाव उज्वल केले.



ही परीक्षा यंदा ४ मे रोजी भारतासह परदेशातील ५,४६८ केंद्रांवर पार पडली. अबूधाबी, दुबई, शारजा, दोहा, सिंगापूर यांसारख्या शहरांतील विद्यार्थ्यांसाठीही केंद्रे उपलब्ध होती.


परीक्षा इंग्रजीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेतली गेली. राष्ट्रीय आकडेवारीनुसार, देशभरातून १२ लाख ३६ हजारांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले असून, याच आधारे त्यांना वैद्यकीय, दंतवैद्यकीय व इतर संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळणार आहे.


विद्यार्थ्यांना निकाल आणि गुणवत्ता यादी (https://neet.nta.nic.in/) या संकेतस्थळावर पाहता येईल.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)