ISRO ने वाचवले 4 अंतराळवीरांचे प्राण, भारताच्या शुभांशू शुक्लाचा समावेश असलेल्या रॉकेटचा संभाव्य अपघात टळला

  124

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमुळे (ISRO) अंतराळातील संभाव्य अपघात टळला आहे. Axiom-4 मिशनसाठीच्या SpaceX Falcon-9 रॉकेटमध्ये उड्डाणापूर्वी आढळलेल्या गंभीर तांत्रिक दोषामुळे 4 अंतराळवीरांचा जीव धोक्यात येण्याची भीती होती. परंतु, इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्या तांत्रिक सल्ल्यामुळे हा संभाव्य अपघात टळला आहे. यामध्ये भारताच्या शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) देखील सहभागी असल्याने ही घटना भारतासाठी अधिक महत्त्वाची ठरते.


इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी अमेरिकेतील Axiom-4 मोहिमेसाठी आवश्यक सुरक्षेच्या बाबतीत आपला ठामपणा दाखवत, फाल्कन-9 रॉकेटमधील संभाव्य धोका उघडकीस आणला. ही रॉकेट भारत, अमेरिका, पोलंड आणि हंगेरीच्या 4 अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार होती. "लिक" (गळती) असलेल्या रॉकेटचे प्रक्षेपण 11 जून रोजी नियोजित होते. पण, इस्त्रोने सखोल चाचण्या आणि "लो टेंपरेचर लिक टेस्ट" ची मागणी केली. स्पेसएक्सकडून यावर तात्पुरत्या उपायांची तयारी होती. परंतु, इस्त्रोने ती साफ नाकारली.


यासंदर्भातील माहितीनुसार 7 सेकंदांची हॉट फायर टेस्ट दरम्यान ऑक्सिडायझरमध्ये द्रव ऑक्सिजन गळती आढळली होती. नंतरची तपासणी दरम्यान, ऑक्सिडायझर लाईनमध्ये वेल्ड क्रॅक (भेग) आढळली. ही भेग "रीसायकल आणि रिफर्बिशड" स्टेजमध्ये होती. ती अद्याप दुरुस्त केली नव्हती.इस्त्रोच्या तज्ज्ञांनी धरलेल्या आग्रहामुळे तो भाग बदलण्यात आला आणि पुन्हा चाचण्या करण्यात आल्या.डॉ. नारायणन हे क्रायोजेनिक इंजिन विकसित करणाऱ्या भारतीय पथकाचा भाग होते. त्यामुळे द्रव ऑक्सिजनसारख्या धोकादायक इंधनाशी संबंधित धोके त्यांना स्पष्ट माहीत होते.इस्त्रोच्या 13 सदस्यीय तज्ज्ञ पथकाने फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवर थेट हस्तक्षेप केला. त्यांनी "सेफ्टी फर्स्ट, लाँच लेटर" ही भूमिका घेतली. भारताचे वैमानिक ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे या मोहिमेत सहभागी आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी इस्त्रोने आवश्यक तो धोरणात्मक निर्णय घेण्यास मागेपुढे पाहिले नाही. पोलंड आणि हंगेरीनेही इस्त्रोच्या भूमिकेचे समर्थन केले.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या