‘मॉन्सून’ने जोर धरल्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

  72

रायगड, रत्नागिरीला ‘रेड’, तर पालघर, जळगाव, अहिल्यानगरला ‘ऑरेंज अलर्ट’


मुंबई : महाराष्ट्रात मॉन्सूनने जोर धरला असून, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शनिवारी (दि. १४ जून) रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) जारी केला आहे.


पुणे, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) लागू आहे.


हवामान खात्याच्या माहितीनुसार, राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच, अरबी समुद्रापासून ओडिशा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.


कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीम परिसरातील चक्राकार वाऱ्यांची स्थितीही पावसाला पूरक ठरत आहे.



नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन!


रायगड आणि रत्नागिरीतील रेड अलर्टमुळे स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याच्या शक्यतेमुळे नदीकाठच्या गावांना विशेष सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्टमुळे प्रवास आणि दैनंदिन कामकाजात खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पालघर, जळगाव, अहिल्यानगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांत येलो अलर्ट असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आहे.



पावसाचा परिणाम आणि खबरदारी :


मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्ते, रेल्वे आणि स्थानिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर भूस्खलनाचा धोका असल्याने प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक