Malegaon Sugar Factory Election : ​'माळेगाव'च्या निवडणुकीत​ चौरंगी लढत!

​ पुन्हा 'पवार' काका- पुतणे भिडणार


बारामतीच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते खा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका- पुतणे​ पुन्हा एकदा समोरासमोर एकमे​कां​शी भिडणार आहेत.​ ​स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही निवडणूक होत आहे. मात्र ​शरद पवार यांच्या पॅनेलने ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मात्र उमेदवार दिलेला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.


?si=HxnxKK-CQXAQvp9Q

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी ​म्हणजे गुरुवारी ​ अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेल आणि शरद पवार यांच्या बळीराजा शेतकरी बचाव पॅनेलने आपले उमेदवार जाहीर केले. यासह चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरू-शिष्यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलने देखील उमेदवार जाहीर ​केले आहेत. ​कष्टकरी शेतकरी पॅनेल​च्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.​ त्यामुळं माळेगाव साखर कारखान्यांची निवडणूक चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ​


माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. चिन्हवाटप ​झाली आहेत. आता प्रचारासाठी केवळ ८ दिवसांचा कालावधी आहे. ​दोन दिवसापूर्वी ​ म्हणजे गुरुवारी ​ सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ​ निरा वागज येथील जाहीर सभेने​ ​झाला आहे. तर ​ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ ​ शनिवारी​ होणार आहे.​ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कँाग्रेस पक्षाला तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. तर अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेलला कप-बशी चिन्ह मिळालेआहे. ​ माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार, हे मात्र निश्चित.

Comments
Add Comment

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर

भारतानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानचे पाणी अडवणार!

काबूल : भारतानंतर आता तालिबानशासित अफगाणिस्तान पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा मर्यादित करण्याची आणि नदीवर धरणे

महादेवाच्या पिंडीवर अवतरली नागदेवता! बघ्यांची उसळली गर्दी

वाडा: तालुक्यातील दुपारेपाडा या गावातील श्री गणेश मंदिरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास या मंदिरातील श्री

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत

मुंबई पोलिसांचा दाऊदच्या टोळीला मोठा झटका! ड्रग्सचा कारखाना सांगलीत तर मास्टरमाइंड दुबईतून पकडला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (गुन्हे शाखेने) एक मोठे ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय जाळे पकडून दाऊद