प्रसिद्ध उद्योगपती काव्या मारन करणार लग्न

  98

मुंबई : सनरायझर्स हैदराबादची मालकीण आणि प्रसिद्ध उद्योगपती काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती चर्चा म्हणजे,. साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक अनिरुद्ध रविचंदर यांच्याशी काव्या मारन लग्न करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर हे दोघे गेल्या एक वर्षापासून एकमेकांना डेट करत होती, आणि आता ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.



काव्या मारन ही सनरायझर्स हैदराबाद या संघाची मालकीण आहे, तर अनिरुद्ध हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक आहेत. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगत जरी असल्या तरी, काव्या मारन आणि अनिरुद्ध या दोघांकडूनही यासंदर्भंत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीय. मात्र रिपोर्टनुसार लवकरच हा विवाह होणार असून, या विवाहासाठी दोन्ही कुटुंबांकडून परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे आता लवकरच या लग्नासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते. काव्या मारन आणि अनिरुद्ध यांचे काही जुने फोटो आणि व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यावरून देखील असा अंदाज व्यक्त केला जात आहे, की ते लवकरच लग्न करणार आहेत.


काव्या मारनची एकूण संपत्ती


काव्या मारन ही सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे, तसेच ती सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण देखील आहे. काव्या मारनची एकूण संपत्ती अंदाजे ४०९ कोटींच्या आसपास आहे. तर काव्या मारनचे वडील कलानिधी मारन यांची संपत्ती १९ हजार कोटींच्या आसपास आहे. तर अनिरूद्ध यांची संपत्ती ५० कोटींच्या आसपास आहे. अनिरूद्ध हे सर्वात महागडे संगीत दिग्दर्शक आहेत, त्यांनी जवान चित्रपटासाठी १० कोटी रुपये फी घेतली होती.तर एआर रहमान एका चित्रपटासाठी ८ कोटी रुपये फी घेतात.

Comments
Add Comment

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली