अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला

  82

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या २७४ पर्यंत वाढली आहे वाढली आहे. विमान कोसळून जमिनीवर जखमी झालेल्या आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच ज्याठिकाणी विमान कोसळले तिथे स्फोट होऊन काहींचा मृत्यू झाला होता. ही संख्या आता ३३ वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे.



लंडनच्या गेटवीक विमानतळाकडे झेपावलेले विमान फ्लाइट एआय १७१ हे गुरूवारी उड्डाण केल्याच्या अवघ्या काही सेकंदामध्येच अहमदाबादच्या बीजे मेडिकल हॉस्टेल आणि कॅन्टीनच्या इमारतीवर कोसळलं होतं.या अपघातात विमानातील आणि मेडिकल कॉलेज मधील २६५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगितले होते.या दुर्घटना झालेल्या विमानात २४२ जण प्रवास करत होते, ज्यापैकी २३० हे प्रवासी, दोन वैमानिक आणि १० क्रू मेंबर्स होते. यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे तर एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. बचावलेला व्यक्ती हा मूळ भारतीय असलेला ब्रिटीश नागरिक आहे.


अहमदाबाद अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (AFES) ने गेल्या २४ तासांत मेघानीनगर परिसरातील विमान अपघात स्थळावरून म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृहाच्या परिसरातून काही मानवी शरीराचे अवयव तसेच एक मृतदेह ताब्यात घेतले आहेत.डीएनएचे नमुने घेऊन पीडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, आणि त्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवले जाणार आहेत.


अतिरिक्त मुख्य अग्निशामक अधिकारी जयेश खाडिया यांनी सांगितलं की विमानाचे शेपूट हे कॅन्टीन इमारतीवर अडकले होते, ते क्रेनच्या मदतीने खाली घेण्यात आले आहे.


२०११ मध्ये व्यावसायिक वापर सुरू झाल्यानंतर बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाचा अपघात हा या प्रकारच्या विमानाचा पहिलाच अपघात ठरला आहे.विमान अपघाताची चौकशी करणारी संस्था एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB)ने एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या २८ तासांनंतर ताब्यात घेतला आहे. केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी शुक्रवारी याबद्दलची माहिती दिली.



टाटा ग्रुप देणार मदत


टाटा ग्रुपने एक निवेदन जारी करत विमानाच्या बाहेर असलेल्या मृतांना देखील मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. निवदेनानुसार, विमानाबाहेरील मृतांच्या कुटुंबियांनाही एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्यांचा वैद्यकीय उपचाराचा खर्चही टाटाकडून उचलला जाणार आहे. जखमींना सर्वतोपरी मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही टाटा ग्रुपकडून सांगण्यात आले आहे. विमान कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी आणि जखमी झालेल्यांमध्ये मेघानीनगर परिसरातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, विद्यार्थी, रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांचा समावेश असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय बोईंग ड्रीमलायनर अपघातात बीजे मेडिकल महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारती

Comments
Add Comment

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये

India Post: ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित, भारतीय टपालची घोषणा

नवी दिल्ली:  ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टॅरिफच्या निर्णयानंतर भारतीय टपाल (India Post) ने अमेरिकेकडे जाणारी