Crypto Income Tax CBDT News: हजारो वीडीए क्रिप्टोग्राफी करचुकवे ट्रेडर्स आयकर विभागाच्या रडावर - सूत्रांची माहिती

प्रतिनिधी: सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (Central Board of Direct Taxes CBDT) यांनी किप्रो करन्सी ट्रेडिंग मध्ये गुंतलेल्या व टॅक्स चुकलेल्या बड्या लोकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एजन्सीचा मते यांनी या क्रिप्टोग्राफी चा माध्यमातून अनेक वर्ष टॅक्स चुकवून पैसे ट्रान्स्फर केले आहेत. त्यामुळे आता व्हरचुअल डिजिटल असेट (Virtual Digital Asset VDA) या माध्यमातून पैसे वळते केल्याचा ठपका या लोकांवर ठेवण्यात आला आहे.


कलम 115 BBH आयकर कायदा 1961 (Income Tax Act 1961) हा कायदा केंद्र सरकारने आणून घटनादुरुस्ती केली होती. त्यामुळे इन्कमटॅक्स चूकवून विडीएमधून पैसे वळवणे हा गुन्हा आहे. या कायद्याअंतर्गत वीडीएतून पैसे ट्रान्स्फर करायचे असल्यास ३० टक्के कर व इतर सेस शुल्क भरावे लागते. याविषयी प्रतिक्रिया देताना सुत्रांनी म्हटले आहे की, 'व्हर्च्युअल डिजिटल असेट (VDA) व्यवहारांमध्ये गुंतलेल्या आणि आयकर कायदा, १९६१ चे पालन करण्यात अयशस्वी ठरलेल्या अशा संस्था आणि व्यक्तींची पडताळणीसाठी ओळख पटवण्यात आली आहे.' तीन वर्षांपूर्वी या कायद्याची संसदेत अंमलबजावणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती.


प्रसारमाध्यमांच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने संबंधित करबुडव्या ट्रेडर्सला ओळखून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी डेटा पॅटर्न ओळखून संबंधित व्यक्तींना त्यांच्यावर सर्वेंलस ठेवलेलख आहे. सीबीडीटीने हजारो जणांना ईमेल करुन त्यांना आयकर विभागाला आपले आयकर रिटर्न दाखवून आपले वीडीआयमधून किती उत्पन्न मिळालेले आहे ते कळवायला सांगितले आहे. विशेषतः ज्यांनी अद्याप विडीएची माहिती सरकारला दिली नाही त्यांना या नोटीशी विशेषतः दिल्या गेल्या आहेत.


यावर क्रिप्टोग्राफी गुंतवणूकदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'आम्ही ट्रेडिंग कसे करायचे ? त्यापेक्षा धंदा बंद करून परदेशातून ऑपरेट करावे' अशी प्रतिक्रिया क्रिप्टोग्राफी सूत्रांनी माध्यमांना दिली आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत २० वर्षीय विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला !

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्याच

'धंगेकर- मोहोळ हा विषय आता संपला, महायुतीमध्ये मतभेद नकोत' : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आळंदीमध्ये वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उभारल्या जातील आळंदी  : कार्तिकी एकादशी आणि त्यानिमित्त होणाऱ्या

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: PSI बदनेला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

सातारा : फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,