Video : कोस्टल रोडच्या बोगद्यात कार उलटली

मुंबई : कोस्टल रोडच्या बोगद्यात जोरदार पावसामुळे एक कार घसरून रस्त्याच्या मधोमध उलटल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता घडली. सुदैवाने गाडीच्या दोन्ही एअर बॅग्स उघडल्या गेल्यामुळे आणि चालकाने सीट बेल्ट लावलेला असल्यामुळे जीवितहानी टळली . मात्र, वाहन रस्त्यावर उलटल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.ज्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. काही काळानंतर वाहतूक पोलिसांनी बोगद्यातील वाहतूक सुरळीतपणे सुरू केली .




नेमकं बोगद्यात घडलं काय?


घटनेच्या वेळी मुंबई सेंट्रल आरटीओ कार्यालयाच्या टॅक्सी मदत पथकाचे वाहन अपघातस्थळाजवळून जात होते. त्यांनी कोस्टल रोडवरील आपत्कालीन लँडलाइन फोनचा वापर करून तत्काळ कंट्रोल रूमला संपर्क साधत अॅम्बुलन्स आणि टोइंग व्हॅन मागवली. मदत पथकातील सदस्यांनी त्वरीत परिस्थिती हाताळत वाहतूक सुरळीत करत वाहनाभोवतीचा परिसर मोकळा केला. टोइंग व्हॅन आल्यावर, अपघातग्रस्त वाहन सरळ करण्यासाठी इतर वाहनचालकांच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर वाहनाचे टोइंग करण्यात आले. या घटनेनंतर कोस्टल रोडच्या समुद्राखालील बोगद्यात उटल्या पडलेल्या कारचे व्हिडीओ समोर आले आहेत






कसा आहे हा बोगदा ?


मरीन ड्राईव्ह ते बांद्रा वरळी सीलिंक या टप्प्यातला हा जवळपास तीन किमी लांबीचा हा समुद्राखालचा बोगदा आहे. हे खोदकाम करण्यासाठी पस्तीस मजूर आणि भलंमोठं चिनी बनावटीचं टनेल बोअरिंग मशीन वापरण्यात आलं. गिरगावजवळ हा बोगदा सुरु होतो. अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी, मलबार हिल यांच्या खालून जात ब्रीच कँडी रुग्णालयाजवळ तो संपतो.संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पासाठी बारा हजार सातशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा असून मे महिन्यामध्येच या मार्गाचं उद्घाटन झालं आहे. कोस्टल रोड प्रकल्प दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागात विभागला गेला आहे.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत