धोकादायक इमारतीतून परिवहनचा कारभार

कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून करावे लागते काम


ठाणे : परिवहन सेवेतील वागळे आगार येथील प्रशासकीय इमारत तसेच वाहतूक भवन इमारतींचे सन १९९८ साली बांधकाम करण्यात आले पण तेव्हापासून कुठल्याही मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीचे काम न झाल्याने या दोन्ही इमारतींच्या बाहेरील बाजूतील भिंत व आरसीसी बांधकाम नादुरुस्त झाल्यामुळे सन २०१७ रोजी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असता या दोन्ही इमारती C2-B श्रेणीत दर्शविल्याने इमारतींची तातडीने दुरुस्ती केल्यास इमारतीचे आयुर्मान किमान १५ ते २० वर्षे वाढेल असे वर्तविले होते.


परंतु या स्ट्रक्चरल ऑडिटला आठ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून देखील कुठलेही दुरुस्तीचे काम न केल्याने इमारतींची दुर्दशा झाली आहे.


त्यामुळे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याची बाब ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे निदर्शनास आणूनदिली आहे.
आज याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांची भेट घेत इमारतींची पाहणी केली असता वाहतूक भवन या इमारतीत कंडक्टर ड्रायवरचा रेस्ट रूम, तिकिटांचा साठा, रेकॉर्ड रूम, कॅश रूम, युनियन ऑफिस असून इमारतीचे कॉलम बीम व बाहेरील बाजूतील प्लास्टर बरेच ठिकाणी खराब झाले आहे.


लीकेजचा प्रॉब्लेम असून इमारतीचे आतील भागातील प्लास्टर पडत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी बोलताना राहुल पिंगळे यांनी सांगितले की ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी जाहीर केली जाते कारण धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


असे असताना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील व परिवहन मंत्र्यांच्या शहरातील परिवहनच्याच धोकादायक झालेल्या व शेकडो कर्मचारी काम करत असलेल्या स्वतःच्या इमारतींकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावेळी त्यांच्या सोबत माजी परिवहन सदस्य भालचंद्र महाडिक, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी,महिला अध्यक्ष स्मिता वैती, संगीता कोटल, सुमन वाघ,श्रीरंग पंडित,अंजनी सिंग,अकिंदर टमाटा श्रीकांत गाडीलकर, अजिंक्य भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या