Thursday, October 30, 2025
Happy Diwali

ठाणे महापालिका क्षेत्रात राबवणार ‘अतिसार थांबवा’ मोहीम

ठाणे महापालिका क्षेत्रात राबवणार ‘अतिसार थांबवा’ मोहीम

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १६ जून ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत ‘अतिसार थांबवा’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षांखालील अतिसार बाधित मुलांना ORS पाकीट तसेच Zinc ची गोळी यांचे वाटप आशा कार्यकर्त्यामार्फत केले जाणार आहे. तसेच अंगणवाडी, आरोग्य केंद्रामधून ORS घोळ तयार करण्याचे व हात धुण्याची प्रात्याक्षिके केली जाणार आहेत. तसेच संस्था स्तरांवर ORS कॉर्नरची स्थापना करणे, जलशुष्कतेने बधित रुग्णांचे उपचार केले जाणार असून अतिसाराबाबत कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

वैयक्तिक व परिसरातील स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसार पसरविणाऱ्या जंतूंचा प्रसार होऊन अतिसाराची लागण होते. उघड्यावर शौचास बसणे, उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे, दैनंदिन जीवनात अशुद्ध पाण्याचा वापर करणे, जेवणाआधी व शौचानंतर स्वच्छ पाणी व साबणाने हात न धुणे आदी सवयी अतिसाराचा प्रादुर्भाव होण्याकरिता कारणीभूत आहेत. अतिसाराच्या उपचाराकरिता ORS चे घोळ तयार करुन बालकाला दिल्यास शरीरातील जलशुष्कतेचे प्रमाण कमी होते, तसेच क्षारांची कमतरताही भरुन निघते, झिंकची गोळी १५ दिवस दिल्यास जुलाबाची वारंवारता कमी होऊन अतिसार लवकर बरा होतो, बाळाला अतिसार किवा जुलाब चालू असताना माता स्तनपान करीत असल्यास स्तनपान सुरु ठेवावे, वाळाला हलके अन्न द्यावे, स्वच्छता राखावी, मुलांचे व स्वतःचे हात वारंवार साबणाने धुवावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

अतिसार टाळण्याकरिता वैयक्तिक व परिसर स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून त्याकरिता उघड्यावर शौचाला बसणे टाळावे, पाणी उकळून व गाळून किंवा क्लोरीनचा वापर करुन निर्जंतुक करावे व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच अतिसाराबाबत लक्षणे आढळल्यास जवळच्या ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन देखील ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा