सेल्फी वेड्यांची विकृती, विमान अपघातानंतर रस्त्यावर पडले महिलेचे शीर, लोकांनी त्यासोबतच घेतले सेल्फी

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण देश हादरला. एअर इंडियाच्या विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले आणि काही वेळातच विमानाचे नियंत्रण सुटले आणि मेघानी नगर परिसरात अपघात झाला. विमानात २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. या अपघातात एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमान क्रॅश झाल्यानंतर मोठी आग लागली होती. घटनास्थळी जळालेले अवशेष, धूर आणि लोकांचे मृतदेह विखुरले होते. हे दृश्य पाहून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असतानाच एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.


विमान क्रॅश झाल्यानंतर मोठा स्फोट झाल्याने अपघाताची तीव्रता खूप जास्त होती. विमानाचे काही भाग इमारतींवर आदळले. त्यामुळे त्याठिकाणीही नुकसान झाले. घटनास्थळी मोठ्या ज्वाळा दिसत होत्या. सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. विमानाचे अवशेष जळालेल्या अवस्थेत होते. मानवी मृतदेह आणि त्यांचे अवयव विखुरलेले होते. अनेक प्रवाशांचे मृतदेह ओळखणेही कठीण झाले होते. काही मृतदेह अर्धवट जळाले होते, तर काही पूर्णत: जळाले होते. या हृदयद्रावक घटनेनंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे.


अपघातानंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्यापैकी एकाने असे कृत्य उघड केले की सर्वांनाच लाज वाटेल. एका महिलेचे डोके कापले गेले होते. शीर रस्त्यावर पडले होते. काही लोक मदतीला धावून जाण्याऐवजी डोक्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी घेत होते. ते त्याचे व्हिडिओ बनवत होते. हे पाहून "माणुसकी संपली का?" असा प्रश्न निर्माण झाला. लोकांच्या या वागण्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर