RENALYX News: रेनलिक्सकडून जगातील पहिले स्वदेशी एआय आधारित स्मार्ट हेमोडायलिसिस मशीन 


मूत्रपिंड निगा यापुढे सुलभ आणि परवडणारी बनणार!


पुढील चार वर्षांत मजबूत उत्पादन क्षमता निर्माण करण्यासाठी ८०० कोटींच्या गुंतवणुकीची योजना 


देशभरातील एंड-स्टेज रीनल डिसीज (ईएसआरडी) रुग्णांसाठी डायलिसिस सुविधा सुलभ करण्याचे उद्दिष्ट


मुंबई: मूत्रपिंडासंबंधी आजारांच्या (रीनल केअर) क्षेत्रातील तंत्रज्ञान रेनलिक्स हेल्थ सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडने रिमोट मॉनिटरिंग आणि क्लिनिकल कनेक्टिव्हिटी सुविधेसह भारतातील पहिले पूर्णपणे स्वदेशी,कृत्रिम प्रज्ञा (Artificial Inteligence) आणि क्लाउड-सक्षम स्मार्ट हेमोडायलिसिस मशीन रेनलिक्स - आरएक्सटी २१ (RENALYX –RxT 21) प्रस्तुत केले आहे. या यंत्राची किंमत ६.७० लाख रुपयांपासून सुरू होते, अर्थात आयात केलेल्या मशीनपेक्षा ती लक्षणीयरीत्या कमी आहे. रेनलिक्स - आरएक्सटी २१ मुळे डायलिसिस परवडणारे आणि मोठ्या लोकसंख्येसाठी उपलब्ध करून दिले जाईल आणि निमशहरी आणि ग्रामीण भागात मूत्रपिंड विकाराच्या उपचारातील मागणी-पुरवठ्यातील दरी भरून काढली जाणे अपेक्षित आहे.


भारतात पूर्णपणे विकसित आणि उत्पादित,रेनलिक्स-आरएक्सटी २१ यंत्र हे क्लाउड-आधारित टेलिनेफ्रॉलॉजी प्लॅटफॉर्मसह नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करते जेणेकरून मूत्रपिंड रुग्ण,एंड-स्टेज रीनल डिसीज (ईएसआरडी)रुग्णांना,विशेषतः हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी,फुफ्फुसीय आणि तीव्र मूत्रपिंड दुखापतीशी संबंधित समस्या असलेल्या रुग्णांना सुरक्षितता आणि दर्जेदार निगेचा लाभ मिळू शकेल. रेनलिक्स -आरएक्सटी २१ मुळे रेनलिक्स ही युरोपीय महासंघ ईयू सीई (EU CE) प्रमाणपत्रासह प्रगत डायलिसिस यंत्र तयार करणारी जागतिक स्तरावरील सहावी आणि भारतातील पहिली कंपनी बनली आहे.


रेनलिक्स पुढील चार वर्षांत,म्हणजेच आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेरपर्यंत ५,००० मशीनची उत्पादन क्षमता निर्माण करण्यासाठी ८०० कोटी रुपये गुंतवण्याची योजना रेनलिक्सने आखली आहे आणि आर्थिक वर्ष २०२७-२८ पर्यंत १,५०० मशीनची अतिरिक्त क्षमता कंपनी विकसित करेल.कंपनीची स्वदेशी वापराच्या वस्तूंचे उत्पादन करण्याची योजना देखील आहे. वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी आणि क्षमता विस्तार योजनांना पाठिंबा देण्यासाठी कंपनीकडे कर्नाटका तील बेंगळुरू आणि म्हैसूर आणि महाराष्ट्रातील मुंबई येथे उत्पादन सुविधा आहेत.कंपनी प्रमुख भारतीय आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या तीव्र स्वारस्याच्या आधारे भागभांडवल विक्रीद्वारे निधी उभारण्याची योजना आखत आहे. याव्यतिरिक्त, ती कर्जाच्या माध्यमातून निधी उभारेल आणि प्रवर्तक भांडवल देखील गुंतविणार आहेत.रेनालिक्सची पुढील तीन वर्षांत सार्वजनिक समभाग विक्री करण्याची योजना देखील आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये या यंत्रांच्या सुरुवा तीच्या तैनाती सह, रेनालिक्स त्याच्या भागीदारांसह रेनलिक्स -आरएक्सटी २१ चे संपूर्ण भारतात जलद वितरण तसेच इतर देशांमध्ये निर्यातही करेल. कंपनीने दक्षिण आफ्रिका,अमेरिका आणि युरोपमधून कार्यादेश मिळवत आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये यशस्वीरित्या प्रवेश केला आहे.


आरएक्सटी २१ च्या अनावरणाबद्दल बोलताना,रेनलिक्स हेल्थ सिस्टीम्सचे संस्थापक आणि संचालक डॉ. श्याम वासुदेव राव म्हणाले,' आमचे अत्याधुनिक हेमोडायलिसिस यंत्र डायलिसिस सुविधा परवडणारी आणि सुलभ बनवून मूत्रपिंडाच्या काळजीमध्ये क्रांती घडवून आणेल,ज्यामुळे देशातील मूत्रपिंडाच्या आरोग्यसेवेची पायाभूत सुविधा मजबूत होतील. डायलिसिस सेवा रुग्णांच्या घराजवळ आणून, आरएक्सटी २१ हे वाढत्या क्रॉनिक किडनी डिसीज (सीकेडी) सारख्या जुन्या आजारांचे ओझे वाहणाऱ्या आणि एंड-स्टेज रीनल डिसीज (ईएसआरडी) रुग्णांना उपचारासाठी मदतकारक ठरेल. आमचे स्वदेशी विकसित हेमोडायलिसिस यंत्र हे डायलिसिसचा खर्च कमी करण्यात परिवर्तनकारी भूमिका बजावेल,ज्यामुळे चांगल्या आणि प्रभावी आरोग्यसेवेचा परिणाम दिसून येईल.पुढे जाऊन,आमची उत्पादन क्षमता वाढवण्याची आणि आयात केलेल्या यंत्रांच्या तुलनेत आरएक्सटी २१ च्या मालकीचा एकूण खर्च ४० टक्क्यांनी कमी करण्याची आमची योजना आहे.पुढील तीन वर्षांत घरगुती डायलिसिस मॉडेलसह तांत्रिकदृष्ट्या प्रगत मशीनची विस्तृत श्रेणी विकसित करण्याची आमची योजना आहे. ‘मेक इन इंडिया - मेक फॉर द वर्ल्ड’ या सरकारच्या दृष्टिकोनानुसार,जागतिक स्तरावर मूत्रपिंडाच्या काळजीच्या पायाभूत सुविधांवर मोठा प्रभाव पाडण्यासाठी आमचे यंत्र विविध देशांमध्ये निर्यात करण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही पुढील पाच वर्षांत जगातील आघाडीचे उत्पादक आणि निर्यातदारांपैकी एक बनण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट राखले आहे.'


भारतीय सीडीएससीओ यंत्राची मान्यता अंतिम टप्प्यात आहे आणि जुलै २०२५ पर्यंत ती मिळणे अपेक्षित आहे, तर अमेरिकेत यूएस एफडीए मंजुरी प्रक्रिया सुरू आहे आणि ती मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.


रेनलिक्स -आरएक्सटी २१ यंत्र क्लाउडवर इंटिग्रेटेड नेफ्रोलॉजी इन्फॉर्मेशन सिस्टम (एनआयएस),एआय आधारित स्मार्ट अल्गोरिदम,इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स (ईएमआर) इंटिग्रेशन,रिअल-टाइम टेलीमेट्रीद्वारे रिमोट डायग्नोस्टिक्स आणि अलर्ट,प्रगत प्रतिमा प्रक्रिया,सतत कामगिरी देखरेख आणि क्लिनिकल देखरेखीसाठी इंटरनेट ऑफ मेडिकल थिंग्ज (आयओएमटी) क्षमता यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत.या प्रगत वैशिष्ट्यांमुळे, डॉक्टरांकडून रुग्णांचे ईएमआर,डायलिसिस यंत्राच्या वर्तमान सेटिंग्ज आणि रुग्णांच्या गंभीर घटनांच्या इतिहासात विनाविलंब दूरस्थपणे प्रवेश करू शकतील जेणेकरून ते आवश्यक उपचार आणि काळजी घेण्याचा प्रभावी सल्ला देऊ शकतील. मोठ्या संख्येने लोकांना मूत्रपिंडाची काळजी उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी), सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी), खासगी डायलिसिस केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये आरएक्सटी २१ स्थापित करण्याची रेनलिक्सची योजना आहे. स्मार्ट यंत्राची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कंपनीने स्थानिक सेवा पथके स्थापन केली आहेत आणि तंत्रज्ञांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले आहेत. कंपनी तिच्या भागीदारांसह संपूर्ण भारतात फ्रँचायझी केंद्रे देखील स्थापित करेल.कंपनी, तिच्या भागीदाराच्या सहकार्याने,संपूर्ण भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फ्रँचायझी केंद्रे स्थापन करेल.


याव्यतिरिक्त,रेनालिक्सने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला (बीईएल) पुढील तीन वर्षांत ६,००० रेनलिक्स - आरएक्सटी १७ चे उत्पादन करण्यासाठी उत्पादन परवाना दिला आहे. रेनलिक्स - आरएक्सटी १७ ही रेनालिक्सने यापूर्वी प्रस्तुत केलेले डायलिसिस यंत्र आहे जे मानक वैशिष्ट्ये आणि सुविधांसह येते. रेनलिक्स-आरएक्सटी २१ आणि आरएक्सटी १७ सह, रेनालिक्स उपचारांच्या पुनरावृत्ती स्वरूपामुळे ग्रामीण भागात डायलिसिस सेवा परवडणाऱ्या आणि सुलभ करण्यात आपली भूमिका बजावण्याचे उद्दिष्ट ठेवते. प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमाच्या (पीएमएनडीपी)आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी एंड-स्टेज रेनल डिसीजचे (ईएसआरडी)अंदाजे २.२० लाख नवीन रुग्ण नोंदविले जातात, ज्यामुळे दरवर्षी ३.४ कोटी डायलिसिस सत्रांची अतिरिक्त मागणी निर्माण होत आहे.


रेनालिक्स हेल्थ सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड बद्दल -


वर्ष २०१२ च्या अखेरीस स्थापन झालेली आणि बेंगळुरूमध्ये मुख्यालय असलेली, रेनलिक्स हेल्थ सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक तंत्रज्ञान नवोन्मेष कंपनी आहे जी व्यापक मूत्रपिंड काळजीसाठी समावेशक उपाय देण्यावर लक्ष केंद्रित करते. क्रॉनिक किडनी डिसीजची (सीकेडी) तपासणी,व्यवस्थापन आणि उपचार करण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या ध्येयाने,रेनलिक्सने नेफ्रोलॉजीसाठी डिजिटल आयओटी आणि कनेक्टेड वैद्यकीय तंत्रज्ञानाचा एक मजबूत संच विकसित केला आहे.रेनालिक्स ही आयएसओ १३४८५ प्रमाणित वैद्यकीय उपकरणे निर्माती कंपनी आहे, जी गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या सर्वोच्च मानकांसाठी वचनबद्ध आहे. कंपनीने जगातील पहिले स्वदेशी हेमोडायलिसिस मशीन, रेनलिक्स -आरएक्सटी २१ चे डिझाइन, विकास आणि तिला सीई-प्रमाणित करून एक मोठा टप्पा गाठला आहे. नावीन्यपूर्णता,परवडणारी क्षमता आणि सुलभतेसाठी एकात्मिक दृष्टिकोनाद्वारे,रेनलिक्सने भारत आणि त्यापलीकडे मूत्रपिंड काळजीचा परीघ (Landscape) विस्तारत नेला आहे.
Comments
Add Comment

IND vs AUS: ३३० धावा करूनही भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ३ गडी राखून पराभव, कर्णधार एलिसा हीलीचे विक्रमी शतक

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील एका अत्यंत रोमहर्षक आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय महिला

समुद्रकिनारी रोमान्स : हार्दिक आणि माहिकाची प्रेमकहाणी उलगडली!

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपला ३२ वा वाढदिवस एक विशेष अंदाजात साजरा केला. आपल्या नव्या

रोज सकाळी भिजवलेले खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे!

मुंबई : ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुकामेवा हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. त्यामध्ये खजूर हे एक

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या: कारणे आणि उपाय

मुंबई : पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. विशेषतः ३०-३५ वर्षांनंतर अनेक पुरुषांच्या केसांची

IND vs AUS : स्मृती-प्रतिकाच्या शानदार अर्धशतकांमुळे भारताचे ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे विशाल लक्ष्य!

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर