मुलाला भेटायला निघाले आई वडील; काळाने घातला घाला

अहमदाबाद : एअर इंडियाचे AI 171 हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले. मात्र, टेकऑफच्या काही मिनिटांमध्येच कोसळले. या विमानातून तब्बल २४२ लोक प्रवास करत होते. विमान क्रॅश होण्याच्या अगोदर पायलटने ATC ला ‘मेडे’कॉल केला होता. मात्र, त्यानंतर ATC चा विमानासोबत संपर्क होऊ शकला नाही. या विमान अपघाताचे धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.



अपघातानंतर लगेचच मदतकार्य सुरू झाले आहे.या विमानातील एक प्रवासी जिवंत असल्याची माहिती पुढे आली आहे. हेच नाही तर अपघातानंतरचा त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. विमानाने दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. मात्र, पुढील काही सेकंदात हे विमान एका मेडिकल कॉलेज च्या कँटिनवर कोसळले . ज्यावेळी हे विमान कोसळले, त्यावेळी मोठा स्फोट देखील झाला.यात विमानातील २४१ प्रवासी आणि मेडिकल कॉलेज मधील काही विद्यार्थी यात मृत्युमुखी पडले. आता एक मोठी माहिती पुढे आलीये. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानात सांगोला तालुक्यातील हातीद गावातील महादेव पवार आणि आशा पवार हे दाम्पत्य देखील होते. दोघेजण आपल्या मुलाकडे लंडनला निघाले होते. त्यांचा मुलगा लंडनमध्ये असल्याने हे दोघे लेकाच्या भेटीसाठी जात होते.परंतु काळाने घाला घातला आणि ते दोघेही या अपघातात दगावले.


विमान अपघातानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहून अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे. विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पडले. यावेळी हा विमान अपघात झाला, त्यावेळी विद्यार्थी जेवण करत होते. एअर इंडियाचे विमान बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळल्याने काही विद्यार्थी गंभीर जखमी तर काहींचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. अहमदाबाद विमानतळावरून दुपारी १:३९ वाजता रनवे २३ वरून या विमानाने आकाशाकडे झेप घेतली.


उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३५ सेकंदामध्ये अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला आहे. पायलटने मेडे कॉल देखील केला होता. मात्र, लँडिंगच्या अगोदरच विमानाचा अपघात झाला. अमित शाह हे देखील अहमदाबादमध्ये पोहोचले असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या