शालेय पोषण आहाराचे कंत्राट कंपनीला देण्यास विरोध

कर्मचारी महिलांचे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन


पालघर : जिल्हा परिषद, अनुदानित, आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारा शालेय पोषण आहार शिजवण्याचा कंत्राट खाजगी कंपनीला देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सदर कंत्राट खाजगी कंपनीला देऊ नये या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.



विद्यार्थ्यांना सकस आणि ताजा पोषण आहार मिळावा तसेच स्थानिक गरजू महिलांना रोजगार मिळावा म्हणून पोषण आहार शिजविण्याचे काम स्थानिक महिलांना देण्याचा नियम आहे. मात्र पालघर जिल्हा परिषदेने हा कंत्राट एका मोठ्या खाजगी कंपनीला देण्याबाबत पत्र काढले आहे. त्यामुळे जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागातील पोषण आहार शिजवणाऱ्या जवळपास तीन हजार महिलांनी आमदार विनोद निकोले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढला.


पालघर जिल्हा परिषदेने आहार शिजवण्याचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्याचा घाट घातला आहे. असे झाले तर आहार शिजवणारे सर्व कर्मचारी बेरोजगार होतील तसेच मुलांना ताजा आहार मिळणे देखील बंद होईल. खाजगी कंपनी जो आहार शिजवेल तो पहाटे शिजवून गावात येईपर्यंत खराब होऊन पोषण मूल्य देखील शिल्लक राहत नाही.


त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नका व कर्मचाऱ्यांना बेरोजगार करू नका अशी मागणी करत हजारो कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. या मागण्यांबाबतचे पत्र आमदार विनोद निकोले व शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना (सीट संलग्न)च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांना देण्यात आले.

Comments
Add Comment

वाढवण बंदरातील रोजगारात भूमिपुत्रांना प्राधान्य : मुख्यमंत्री

पालघर : पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणारे मच्छीमार बांधव आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्यावर कोणतीही गदा येऊ नये,

उत्तन-विरार सी लिंकला हिरवा कंदील

५८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या आराखड्यास मान्यता मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या

वसईत विषारी वायूची गळती ; १३ जण बाधित

वसई : पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या वायूच्या सिलेंडरमधून विषारी वायूची गळती झाली. या वायू गळतीमुळे परिसरातील

विक्रमगडमध्ये आदिवासी सेवा मंडळाच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्याची आत्महत्या

विक्रमगड  : विक्रमगड तालुक्यातील जव्हार आदिवासी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ‘माण’ येथील आदिवासी सेवा मंडळाच्या

फुटबॉल मॅचेससाठी घरातून निघाला पालघरात मृतावस्थेत सापडला; मुंबईच्या अंडर-१६ खेळाडूचा रहस्यमय मृत्यू

पालघर : मुंबईजवळील पालघर परिसरात एका फुटबॉल खेळाडूचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ‘पुण्याला

डहाणूत थेट, तर तीन ठिकाणी तिरंगी लढत

महायुतीचे उमेदवार आले आमने-सामने गणेश पाटील पालघर/ वाडा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर