सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये नगरपालिकांच्या निवडणुका

राज्य सरकारकडून प्रभाग रचनेचे आदेश


अलिबाग : निवडणूक अयोगाने दिलेल्या आदेशानुसार पनवेल महापालिकेसह अलिबाग, पेण, उरण, कर्जत, माथेरान, खोपोली, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, महाड या नगरपालिकांमध्ये येत्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेसह अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, माणगाव, मुरुड, तळा पंचायत समित्यांसाठीही या निवडणुका होणार आहेत. राज्यातील `ड’ वर्गातील १९, महापालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये पनवेल महापालिकेचा समावेश आहे.



मागील तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. आधी कोरोना आणि नंतर न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लटकल्याने या निवडणुका खोळंबल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत.


या आदेशांचे पालन करताना नगरविकास विभागाने अ, ब, क वर्ग या दहा महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत, तर `ड’ वर्ग १९ महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रभाग रचनेसाठी साधारणत: अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असून, यासाठी गुगल मॅपचा आधार घेण्यास सांगण्यात आले आहे. महायुतीत शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात ८ सप्टेंबर २०२२ च्या अधिनयमानुसार अ, ब, क व ड वर्ग महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे; परंतु अपवादात्मक परिस्थितीत तीन किंवा पाच सदस्य प्रभाग रचना असेल.


आयोगाने मान्यता दिल्यानंतर प्रभाग रचना महापालिका आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यावर हरकती सुचना मागविण्यात येणार आहेत. यावर सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येणार आहे. ही अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार असून, प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करेपर्यंत ही प्रभाग रचना गुप्त ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. या सर्व प्रक्रियेला अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

Comments
Add Comment

आंबा बागेमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

खालापूर : थंडीच्या दिवसात आंब्यांना उत्तम मोहर आला आहे. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात थंडीमुळे आंब्यावर

जिल्ह्यात ८ हजार ५८ हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी

यंदा १२ हजार ६३४.३५ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, भाजीपाला लागवड अलिबाग : भाताचे कोठार म्हणून रायगडाची ओळख पुसली

परिवर्तन विकास आघाडीला मतदारांचा कौल

डॉक्टर, वकील शिक्षित उमेदवारांना मतदारांनी नाकारले ! राहुल देशमुख कर्जत : नगराध्यक्षपदासाठी परिवर्तन विकास

नवी मुंबई विमानतळावरून उद्यापासून उड्डाणे

नवी मुंबई : भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

अलिबागमध्ये शेकापला रोखण्यात भाजप, शिवसेना अपयशी

उबाठाचे दोन शिलेदार विजयी, भाजपाला एकच जागा सुभाष म्हात्रे अलिबाग : अलिबाग नगर परिषदेत महाविकास आघाडीतील

रोहा नगर परिषदेवर पुन्हा राष्ट्रवादी

रोहा : स्वराज्य स्थानिक निवडणुकीमध्ये २ डिसेंबर रोजी रोहा नगर परिषदेच्या हद्दीत मतदान घेण्यात आले. त्याची