Local train: लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकल्याने प्रवाशाचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात एक दुर्देवी घटना घडली आहे. येथील लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत एक प्रवासी अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरूवातीला हा प्रवासी चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करत असताना फटीत अडकून मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. मात्र या घटनेची सत्यता समोर आली आहे.

संजय जगजप्पा मातंगे असं या प्रवाशाचं नाव आहे. संजय हे स्थानकात रेल्वेची वाट पाहत होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते लोकलवर आदळले. यातच ते लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकले.

त्यांना तातडीने पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले मात्र ते अंत्यवस्थ अवस्थेत होते. त्यांच्या छातीवर दाब देत पंपिंगही करण्यात आले मात्र त्यांची हालचाल होत नव्हती. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृ्त्यू झाला होता.
Comments
Add Comment

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक