Saturday, October 25, 2025
Happy Diwali

इराणवर इस्रायलचा अभूतपूर्व हवाई हल्ला; १०० ठिकाणे उद्ध्वस्त, तीन वरिष्ठ अधिकारी ठार

इराणवर इस्रायलचा अभूतपूर्व हवाई हल्ला; १०० ठिकाणे उद्ध्वस्त, तीन वरिष्ठ अधिकारी ठार

जेरुसलेम : इस्रायलने रात्रभर इराणवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने जाहीर केले की २०० हून अधिक लढाऊ विमानांनी इराणमधील सुमारे १०० लष्करी ठिकाणांवर एकाचवेळी जोरदार हल्ला केला.

या हल्ल्यांमध्ये इराणचे तीन अत्यंत महत्त्वाचे लष्करी अधिकारी ठार झाले आहेत. इराणी सशस्त्र दलांचे प्रमुख, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर आणि आपत्कालीन कमांडचे प्रमुख. आयडीएफने या अधिकाऱ्यांना जगासाठी धोका ठरलेले रक्तरंजीत हाताचे गुन्हेगार असे संबोधले आहे.

ही मोहीम ऑपरेशन रायझिंग लायन नावाने राबवण्यात आली आहे. यामागील उद्देश इराणच्या अणु कार्यक्रमाला रोखणे आणि इस्रायलविरोधात इराणने अलीकडे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आणि प्रॉक्सी कारवायांचा बदला घेणे .

या हवाई कारवाईमुळे इस्रायल-इराण संघर्ष अधिक तीव्र झाला असून प्रादेशिक युद्धाचे सावट निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, तर इराणकडून जोरदार प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment