मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: विक्रोळीचा नवा पूल उद्यापासून खुला!

मुंबई: विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री (LBS) मार्गाला पूर्व द्रुतगती मार्गाशी (Eastern Express Highway) जोडणारा अत्यंत महत्त्वाचा ६१५ मीटर लांबीचा पूल मुंबई महानगरपालिकेने (BMC) यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेचं अभिनंदन केले आहे.


मुख्यमंत्री म्हणाले की, पावसाळ्यात LBS मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ही गैरसोय लक्षात घेता, कोणत्याही अधिकृत उद्घाटनाची वाट न पाहता हा पूल मुंबईकरांसाठी तातडीने खुला करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. तसे आदेशही त्यांनी दिले आहेत.



या पुलाच्या कामाचे आदेश २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या पुलासाठी १०४.७७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.


पुढील काळात पावसाळा सुरू होत असल्याने मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा पूल शनिवार, दिनांक १४ जून २०२५ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलिसांना देण्यात आले आहेत. या नव्या पुलामुळे विक्रोळी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर