Air India Plan Crash: अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाचा डीव्हीआर सापडला

विमान अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय चालले होते? याचे रहस्य उलगडणार


अहमदाबाद: अहमदाबादमध्ये दुर्दैवी अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (DVR) सापडला आहे. त्यामुळे अपघात नेमका कशामुळे आणि शेवटच्या क्षणी नेमके काय घडत होते? याचा उलगडा होणार आहे. 


अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्दैवी अपघाताच्या दुसऱ्या दिवशी गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी विमानाच्या ढिगाऱ्यातून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) शोधून काढला.  विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा पुरावा आहे. 


घटनास्थळी उपस्थित असलेल्या गुजरात एटीएस अधिकाऱ्याने सांगितले की, 'हा एक डीव्हीआर आहे, जो आम्ही ढिगाऱ्यातून मिळवला आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) टीम लवकरच येथे येईल आणि डिव्हाइसची तपासणी करेल, ज्यामुळे अपघाताच्या घटनांच्या क्रमाबद्दल महत्त्वाचे संकेत मिळू शकतात.' डीव्हीआर सापडल्याने दुर्दैवी विमान अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय घडले याची माहिती गोळा करण्यास मदत होईल.



'बोईंग ७८७ ड्रीमलायनर' चा दुर्दैवी अपघात


 गुरुवारी अहमदाबादमध्ये येथे झालेल्या या भीषण विमान अपघातात २६५ जणांना आपला जीव गमवावा लागला. एअर इंडियाचे विमान एआय-१७१ २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी रवाना झाले. प्रवाशांमध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज नागरिक आणि एक कॅनेडियन नागरिक होता, तर दोन पायलटसह एकूण १२ क्रू मेंबर्स फ्लाइटमध्ये उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला उड्डाण करणारे हे  प्रवासी विमान, उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानतळानजीक जवळच्या निवासी संकुलात कोसळले. या विमानाचा मागचा भाग मेघानी नगर येथील बीजे मेडिकल कॉलेजच्या यूजी हॉस्टेल मेसवर पडला, ज्यामुळे इमारतीचे मोठे नुकसान तर झालेच पण याबरोबरच त्यामधील २४ वैद्यकीय विद्यार्थांचा देखील मृत्यु झाला. तर अनेक वैद्यकीय आणि नर्सिंगचे विद्यार्थी यात गंभीर जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 



अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू


डीव्हीआर आणि ब्लॅक बॉक्समध्ये फरक आहे आणि अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स अद्याप सापडलेला नाही. डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) आणि ब्लॅक बॉक्स दोन्हीचे काम डेटा रेकॉर्ड करणे आहे, परंतु डीव्हीआर सहसा सुरक्षा कॅमेऱ्यांमधून फ्लाइटचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो, तर ब्लॅक बॉक्स फ्लाइट डेटा आणि कॉकपिट ऑडिओ रेकॉर्ड करतो. डीव्हीआर आणि ब्लॅक बॉक्समध्ये खूप फरक आहे डीव्हीआर अनेकदा देखरेखीच्या उद्देशाने सुरक्षा कॅमेऱ्यांमधून व्हिडिओ फुटेज रेकॉर्ड करतो. डीव्हीआरमधून रेकॉर्ड केलेला व्हिडिओ डेटा सहसा हार्ड ड्राइव्ह किंवा क्लाउड स्टोरेजमध्ये संग्रहित केला जातो. डीव्हीआर प्रामुख्याने व्हिज्युअल डेटा रेकॉर्ड करतो. ब्लॅक बॉक्स (फ्लाइट डेटा रेकॉर्डर) विमानाचा वेग, उंची, इंजिन थ्रस्ट इत्यादी आणि कॉकपिट ऑडिओ (पायलट संभाषण) यासारख्या फ्लाइट डेटा रेकॉर्ड करतो. ब्लॅक बॉक्समध्ये विशेष रेकॉर्डर वापरले जातात जे गंभीर अपघात झाल्यास देखील नुकसान न होता राहण्यासाठी डिझाइन केलेले असतात.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या