एमआयडीसी निवासी भागातील नवीन काँक्रीट रस्ते तोडणे सुरूच

गेल्या वर्षभरात अंदाजे ३० ठिकाणी रस्ते तोडले


कल्याण : एमआयडीसी निवासी मध्ये नवीन बनवलेले काँक्रीट रस्ते एका मागोमाग तोडणे सुरूच आहे. महावितरणची भूमिगत मेन केबल ही नानासाहेब धर्माधिकारी रस्त्यावरील सोनाक्षी सोसायटी समोर नादुरुस्त झाल्याने रस्ता तोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मात्र यावेळी सदर रस्ता तोडण्याची वेळ रात्री दहाच्याआसपास घेतली होती. कारण असे काँक्रीट रस्ते तोडताना लोकांचा विरोध होत असल्याने तसेच हा एमआयडीसी मधील महत्त्वाचा वर्दळीचा मुख्य रस्ता असल्याने तो रात्री तोडण्याचा निर्णय घेतला असावा.



बुधवारी रात्री अचानक जेसीबी सहित आठ, दहा जण येऊन रस्ता तोडण्यास सुरवात केली गेली. त्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी लगेच तेथे नवीन केबल टाकून घेतली आहे. हा एमआयडीसी मधील मुख्य रस्ता तोडला गेल्याने येथील नागरिकांनी आपला राग समाजमाध्यमाद्वारे व्यक्त केला आहे. यात महावितरणची कोणतीही चूक दिसत नाही कारण लोकांचा वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. एमएमआरडीएकडून नवीन काँक्रीट रस्ते बनविताना भूमिगत वीज केबल रस्त्याच्या बाजूला घेण्यासाठी महावितरणला अवधी दिला गेला नाही.

एमआयडीसी मधील नवीन काँक्रीट रस्ते बनविल्यापासून गेल्या वर्षभरात एकापाठोपाठ अनेक रस्ते हे विविध वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी तोडले जात आहेत. परंतु ते रस्ते पुन्हा दुरूस्त किंवा पूर्वीप्रमाणे ठीकठाक करण्यात आले नाहीत. गेल्या वर्षभरात एमआयडीसी निवासी मध्ये असे रस्ते तोडण्याची संख्या अंदाजे ३०आसपास झाली आहे. त्यामुळे जनतेचा पैशाचा अपव्यय होत आहे. जनतेचे सेवक, प्रतिनिधी हे सर्व आता चुपचाप पाहत आहेत. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीला येथील विविध समस्यांचा त्रागा जनता त्यांच्यासमोर मांडून जाब विचारेल यात शंका नाही. असे मत यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी व्यक्त
केले आहे.
Comments
Add Comment

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून