नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी

नवी मुंबई : “मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे अधिकृतपणे प्रदान केली जाणार आहेत. यामध्ये ॲबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे.


इरादापत्र प्रदान समारंभ आज ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला धर्मेंद्र प्रधान, मा. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.


महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, सिडकोमार्फत उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमुळे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार असून, हे शिक्षण विविध संस्कृतींच्या आदान-प्रदानाला चालना देईल आणि विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये सहकार्य व संवाद वाढवेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ५ किलोमीटर परिसरात टॉप १० परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे. ही देशातील पहिली अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी ठरणार आहे. हा प्रकल्प नवी मुंबई व मुंबईला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देईल.

Comments
Add Comment

Navi Mumbai Airport Passenger Test : २५ डिसेंबरला नवी मुंबईतून पहिले उड्डाण! पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी; विमानतळ सेवेसाठी सज्ज

नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) उद्घाटनानंतरची सर्वात मोठी बातमी समोर आली

नवी मुंबईत सिडकोच्या ४ हजार ५०८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध

नवी मुंबई  : सिडकोच्या इतिहासात प्रथमच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ४ हजार ५०८ घरांची

नवी मुंबईत वर्षभर वाहतुकीत बदल

खारघर-तुर्भे लिंक रोड भूमिगत बोगदा प्रकल्पाचे काम सुरू नवी मुंबई : सिडकोच्या भूमिगत खारघर-तुर्भे लिंक रोड

२५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो आणि अकासा विमानसेवा सुरू

मुंबई : २५ डिसेंबर रोजी नवी मुंबईच्या विमान तळावरून प्रत्यक्षात पहिले व्यवसायिक विमान उड्डाण घेणार आहे. शिवाय

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला, कंटेनर दिडींत घुसल्याने महिला किर्तनकाराचा मृत्यू!

आळंदी: आळंदीला पायी निघालेल्या दिंडीमध्ये कंटेनर ट्रेलर घुसल्याने झालेल्या अपघातात उरण येथील कीर्तनकार मंजुळा