Bank of Maharashtra: खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रसह आणखी ३ बँकांनी व्याजदरात कपात केली !

  177

प्रतिनिधी: बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, कॅनरा बँक यांनी आपल्या व्याजदरात ०.५०% बीपीएस पूर्णांकांने कपात केली आहे व अनेक बँकांनी आपल्या कर्ज व्याजदरात (Loan Interest) मध्ये घट केली होती. आरबीआयने नुकत्याच आपल्या रेपो दर (Repo Rate) ६% वरून ५.५०% केला होता. आरबीआयने (RBI) ने तब्बल ०.५०% म्हणजेच अर्ध्या टक्क्याने कपात केल्याने बाजारात तरतलेत (Liquidity) वाढ झाली होती.तसेच अर्थव्यवस्थेत चालना मिळण्याबरोबरच कर्जाचे दर कमी होणे अपेक्षितच होते. त्यानंतर बँकानी रेपो दरात कपात करणे सुरू केले. नुकतीच एचडीएफसी,आयसीआयसीआय बँकेने व्याजदरात कपात केली होती. त्याची पुनरावृत्ती करत बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, कॅनरा बँक यांनी व्याजात कपात केली आहे.

किरकोळ कर्ज (Retail Loan), गृहकर्ज, शिक्षण कर्ज, चारचाकी कर्ज व इतर कर्जधारकांना याचा लाभ होणार आहे. जून १० पासून हा नवा अध्यादेश लागू असेल. बँक ऑफ महाराष्ट्राच्या गृहकर्जाचे नवीन व्याजदर ७.३५% व ७.७% इतके असतील असे बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. बँक ऑफ बडोदानेही याआधी आपल्या मार्जिनल कॉस्ट लेंडिग रेट (MCLR) मध्ये ५ बेसिस पूर्णांकाने घट केली होती. रिझर्व्ह बँकेने आपल्या तसेच कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये (CRR) १०० बेसिस पॉइंट्सची कपात करून तो ३ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, ज्यामुळे बँकिंग व्यवस्थेत आधीच असलेल्या अतिरिक्त तरलतेत २.५ लाख कोटी रुपये वाढतील असे तज्ञांचे म्हणणे आहे.

याशिवाय युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसिज बँक या बँकेनेही आपल्या कर्ज व्याजदरात ५० बेसिस पूर्णांकाने कपात केली आहे. या निर्णयामुळे, युनियन बँक ऑफ इंडियाने त्यांचे EBLR (External Benchmark Lending Rate) आणि RLLR (Repo Linked Lending Rate) पूर्णपणे RBI च्या अलिकडच्या दर कपातीशी सुसंगत राखल्याने आता व्याजात कपात होईल. यामध्ये जे नवीन आणि विद्यमान किरकोळ (घर, वाहन, वैयक्तिक इ.) आणि लघु मध्यम कर्ज (MSME) कर्जदारांसाठी फायदेशीर ठरेल, असे त्यात म्हटले गेले आहे.

बुधवारी झालेल्या बैठकीत, गुरुवारपासून लागू होणारा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ५० बेसिस पूर्णांकाने ८.८५ टक्क्यांवरून ८.३५ टक्के कमी करण्यास मान्यता दिली आहे, असे बँकेने एका निवेदनात म्हटले आहे. कॅनरा बँकेनेही RLLR मध्ये ८.७५ टक्क्यांवरून ८.२५ टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय दरम्यान, बँक ऑफ बडोदा (BoB) ने देखील त्यांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये ५ बेसिस पूर्णांकाने कपात केली आहे असे बँकेनी सांगितले.
Comments
Add Comment

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी