पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करणाऱ्या अर्जुनचा अपघाती मृत्यू

  102

अहमदाबाद: अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे सुपुत्र अर्जुनभाई मनूभाई पटोलिया यांचा १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर तिच्या अस्थी विसर्जन आणि दशक्रिया विधीसाठी लंडनहून वाडिया येथे आलेले अर्जुनभाई लंडनला परत जात असतानाच काळाने त्यांना गाठले. या हृदयद्रावक घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण वाडिया गावावर शोककळा पसरली आहे.


अर्जुनभाई पटोलिया हे मूळचे अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे रहिवासी होते आणि गेली काही वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नीचे नुकतेच लंडनमध्ये निधन झाले होते. पत्नीच्या अंतिम इच्छेनुसार, तिच्या अस्थी विसर्जनासाठी आणि दशक्रिया विधीसाठी ते आपल्या गावी वाडिया येथे आले होते. १२ जून २०२५ रोजी ते एअर इंडियाच्या AI171 विमानाने लंडनला परत जाण्यासाठी निघाले होते.


सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी झेपावलेले एअर इंडियाचे बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर क्षणार्धात कोसळले. हा अपघात अहमदाबादमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलजवळ घडला. या भीषण अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा, तर जमिनीवरील २४ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातातून केवळ एक प्रवासी सुखरूप बचावला आहे. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह १६८ भारतीय, ५२ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनडाच्या नागरिकाचा समावेश आहे.


या दुर्घटनेत अर्जुनभाई पटोलिया यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात सुरतमध्ये राहणारी त्यांची आई आणि लंडनमध्ये राहणारी त्यांची दोन मुले आहेत. आधीच मातृछत्र हरपलेल्या या मुलांना आता पितृशोक झाल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मेघाणीनगर परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेने अहमदाबादसह संपूर्ण गुजरात हादरले आहे.


अर्जुनभाईंच्या दोन्ही मुलांच्या भविष्याबद्दल आता चिंता व्यक्त केली जात आहे. आई-वडिलांच्या अकाली निधनानंतर या मुलांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना सतावत आहे. वाडिया गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या