Air India Plane Crash: वडिलांचा मृतदेह ओळखण्यासाठी घेण्यात आला 8 महिन्याच्या बाळाचा DNA

अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह कुटुंबांकडे सुपूर्द केले जात आहेत. मात्र या भयानक अपघातात अनेक मृतदेह ओळखण्यापलीकडच्या अवस्थेत असल्याकारणामुळे, प्रवाशांच्या नातेवाईकांच्या DNA टेस्टद्वारे मृतदेहाची ओळख पटवली जात आहे. दरम्यान या अपघातात मृत्यू झालेल्या अदनान मास्टर यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी, त्यांच्या नवजात बालकाच्या डीएनएचे नमुने घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.


गुरुवारी अहमदाबाद येथून लंडनला प्रस्थान करणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण करताच काही वेळेत खाली कोसळले.  या अपघातात एकूण २७० लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये विमान ज्या इमारतीला जाऊन आदळले त्या इमारतीत असलेल्या लोकांचादेखील समावेश आहे.  दरम्यान, महम्मद अदनान मास्टर यांचा देखील या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अदनान मास्टर यांचा मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटवणं कठीण जात होते. त्यामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या अब्राहम या 8 महिन्यांच्या बाळाचे डीएनएचे नमुने घेण्यात आले आहे.



ईदसाठी भारतात आले होते अदनान यांचे कुटुंब 


अदनान हे लंडनचे रहिवाशी होते. पत्नी मंदाशा आणि आपल्या 8 महिन्याच्या मुलासोबत ते भारतात आपल्या घरी कुटुंबीयांसोबत ईद साजरा करण्यासाठी आले होते. काही दिवसांच्या सुट्टीनंतर हे कुटुंब इंग्लंडला परतणार होते. त्यानुसार 21 जूनला अदनान मास्टर यांचं आठ महिन्याचं बाळ आणि त्यांची पत्नी लंडनला जाणार होते. तर अदनान यांनी महत्वाच्या कामासाठी 9 दिवस आधी म्हणजेच दिनांक 12 जून रोजी लंडनला जाण्यासाठी AI 171 मधून एकटेच प्रवास करत होते, आणि यादरम्यानच काळाने त्यांच्यावर झडप घातली. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले!


अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून केली जात आहे. उच्च तापमानामुळे पुरावे नष्ट होण्याचा धोका आहे, ज्यामुळे वेगाने काम करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. आतापर्यंत 2o5 डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. जसेजसे मृतांचे नातेवाईक पोहोचले आहेत, तसे डीएनए टेस्ट केले जात आहेत. परदेशातील प्रवाशांचे देखील नातेवाईक अहमदाबादला पोहोचले आहेत. त्यांचेही डीएनए सॅम्पल घेतले जात आहेत. येत्या काही दिवसांत सर्व मृतदेहांची ओळख पटण्याची अपेक्षा आहे. यानंतर मृतांचा खरा अधिकृत आकडा जाहीर केला जाणार आहे.

Comments
Add Comment

आरबीआयच्या गोट्यातून नवी बातमी - फिनो पेमेंट बँकेला स्मॉल फायनान्स बँकेचा दर्जा प्राप्त

मोहित सोमण  आरबीआयच्या नव्या निर्देशानुसार फिनो पेमेंट बँकेला (Fino Payments Bank) स्मॉल फायनान्स बँकेचा (SFB) दर्जा मिळाला

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अर्थ विशेष - खरच आपल्याला संपूर्णपणे बाबासाहेब कळलेत? कृपया त्यांना मर्यादित करू नका !

मोहित सोमण आज डॉ बाबासाहेब आंबेडकर ६९ वा महानिर्वाण दिन आहे. खरच समाजाला संपूर्णपणे बाबासाहेब आंबेडकर समजलेत का?

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत! मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर