Ahmedabad plane crash: विमान अपघातातील मृतांचा आकडा २५६वर

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक येथे जात असलेले एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान AI-171 गुरूवारी टेक ऑफ करतात लगेचच क्रॅश झाले. आतापर्यंत या अपघातात २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. डेप्युटी कमिशनर यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह एकूण २४२ लोक होते.


रडार डेटाच्या माहितीनुसार विमानाने दुपारी १.३९ मिनिटांनी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. मात्र समुद्रतळापासून ६२५ फूटच्या उंचीवर पोहोचल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड आला आणि त्याचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी असलेला संपर्क तुटला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील प्रवास करत होते.



विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू


गुरूवारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान क्रॅश झाले आणि मेघानीनगर येथील मेडिकल कॉलेजच्या मेस बिल्डिंगला आदळले. यानंतर अतुल्यम हॉस्टेलला हे विमान आदळले. यामुळे विमानाचे आगीच्या गोळ्यात रुपांतर झाले. चारही बाजूंनी धुराचे लोळ आणि मलबा पसरला होता. एकच हल्लाकल्लोळ झाला.


विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद पोलिसांनी सांगितले की विमान दुर्घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयात २६५ मृतदेह आणण्यात आले. मृतांमध्ये हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.



एक प्रवासी सुखरूप


विमान दुर्घटनेत एक प्रवासी सुखरूप असल्याची बातमी समोर आली आहे. या प्रवाशाचे नाव रमेश विश्वास कुमार आहे. या रुग्णावर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या