Ahmedabad Plane Crash Boeing: बोईंग कंपनीचा शेअर ४.८२% कोसळला गुंतवणूकदारांमध्ये 'चिंता'

  47

प्रतिनिधी: अहमदाबाद येथील विमान अपघातात २४२ पेक्षा अधिक मृत्युमुखी पडले होते.अजूनही अनेक मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.असे असतानाच शेअर बाजारातही त्यांचे पडसाद पहायला मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बोइंग (Boeing) कंपनीचा समभाग (Share) सकाळी १०.३० पर्यंत ४.८२% कोसळला आहे. जर्मन विमान उत्पादन कंपनी बोईंगला याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे समभाग ४.८२% कोसळल्याने दर २०३.७५ डॉलर प्रति समभाग सुरू आहे.प्री -ओपन (Pre Open Session) मध्ये तर कंपनीचा समभाग ८% कोसळला होता.बुधवारी, बोईंगचा शेअर ०.८% घसरून २१४ डॉलरवर स्थिरावला. तथापि, गेल्या तीन महिन्यांपासून हा शेअर वरच्या दिशेने आहे, या कालावधीत २४% वाढ झाली आहे.


अहमदाबाद विमान अपघातामुळे बोईंगच्या या बहुचर्चित विमानाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढल्याने बोईंग काउंटरमध्ये (Counter Sell) विक्री झाली.अहमदाबादमधून निघालेले विमान एअर इंडियाचे विमान AI171,बोईंग 787-8 विमान होते.उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. मृत्यूमुखी पडलेल्या पीडित नागरिकांमध्ये १६९ भारतीय नागरिक,५३ ब्रिटिश नागरिक,सात पोर्तुगीज नागरिक आणि एक कॅनेडियन नागरिकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना याबद्दल चिंता वाटल्याने त्याचा फटका बाजारात समभागांना बसला होता. अहमदाबाद विमान अपघात घटनेमुळे नवीन तपासांची मालिका सुरू होऊ शकते आणि त्यामुळे कायदेशीर आव्हाने निर्माण होऊ शकतात.


दरम्यान, बोईंगचे अध्यक्ष आणि सीईओ केली ऑर्टबर्ग यांनी टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्याशी बोलून भारतीय तपासकर्त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटल्याप्रमाणे, 'एअर इंडिया फ्लाइट १७१ मधील प्रवाशांच्या आणि क्रूच्या प्रियजनांसोबतच अहमदाबादमधील पिडित झालेल्या प्रत्येकाप्रती आमच्या मनापासून संवेदना आहेत' असे ऑर्टबर्ग यांनी म्हटले आहे. दरम्यान यापूर्वीही बोईंग विमानाचे अपघात प्रसंग घडले होते.ऑक्टोबर २०१८ मध्ये बोईंग लायन एअरचे ७३७ मॅक्स विमानाचा जावा सी मध्ये अपघात झाला होता. ज्यामध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं