Ahmedabad plane crash : विमान अपघातात आतापर्यंत २७० मृतदेह आढळले, ७ जणांची ओळख पटवण्यात यश

  98

अहमदाबाद : एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर आज, शुक्रवारी घटनास्थळाहून आतापर्यंत २७० जणांचे मृतदेह आढळून आलेत. यामध्ये विमानाचे प्रवासी आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचा समावेश आहे. यापैकी ७ मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव नातेवाईकांना सोपवण्यात आले. परंतु, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.


अपघातग्रस्त विमानामध्ये २४२ प्रवासी होते. त्यापैकी एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. यामुळे सुमारे २४१ प्रवासी आणि हॉस्टेलमधील डॉक्टर्स असे एकूण २७० मृतदेह आहेत. परंतू, विमानाच्या प्रवाशांच्या संख्येपेक्षा जास्त असलेले मृतदेह कोणाचे आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अपघातावेळी हॉस्टेलच्या मेसमध्ये ५० हून अधिक लोक होते, असे सांगितले गेले आहे. जसेजसे मृतांचे नातेवाईक पोहोचले आहेत, तसे डीएनए टेस्ट केले जात आहेत. परदेशातील प्रवाशांचे देखील नातेवाईक अहमदाबादला पोहोचले आहेत. त्यांचेही डीएनए सॅम्पल घेतले जात आहेत. येत्या काही दिवसांत सर्व मृतदेहांची ओळख पटण्याची अपेक्षा आहे. यानंतर मृतांचा खरा अधिकृत आकडा जाहीर केला जाणार आहे.


सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २७० हून अधिक मृतदेहांचे पोस्टमार्टेम झाले आहे. यापैकी २२० मृतदेहांचे डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत. ७ मृतदेहांची ओळख पटली आहे. विमान अपघात प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच विमान अपघात तपास ब्युरोसह (एएआयबी) ८ एजन्सींनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यामध्ये युकेची अपघात चौकशी शाखा (युके-एएआयबी), युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (एनटीएसबी), फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या