विमान अपघातात १५ वर्षीय आकाशचा मृत्यू, आई गंभीर जखमी

अहमदाबाद : अहमदाबाद येथील बी. जे. मेडिकल कॉलेजजवळ गुरुवारी दुपारी घडलेल्या भीषण विमान अपघातात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. एअर इंडिया AI 171 हे विमान लंडनसाठी उड्डाण घेताच अवघ्या एका मिनिटात कोसळले आणि या दुर्घटनेत २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात क्रू आणि प्रवासी मिळून विमानातील २४१ जणांचा आणि हॉस्टेल परिसरातील काही नागरिकांचा समावेश आहे. दुर्घटनेचा फटका बी. जे. मेडिकल कॉलेजच्या बाहेर चहा विकणाऱ्या १५ वर्षीय आकाश यादव व त्याच्या आईला बसला. तसेच अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले आहे. ज्यामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.


विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेचा फटका बी. जे. मेडिकल कॉलेजच्या बाहेर चहा विकणाऱ्या १५ वर्षीय आकाश यादव व त्याच्या आईला बसला. अपघाताच्या वेळी आकाश आपल्या आईसोबत दुकानात होता. विमानाचे काही तुकडे थेट त्यांच्या चहाच्या गाड्यावर येऊन कोसळले. यात आकाशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई रेखा यादव या गंभीर जखमी झाली आहे. रेखा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर