विरारमध्ये फक्त ७०० जाहिरात फलक अधिकृत

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सर्व प्रमुख रस्ते, बाजारपेठा वेगवेगळ्या जाहिरातींच्या फलकाने गजबजलेले दिसत असले तरी, महापालिकेकडून परवानगी घेऊन लागलेले केवळ ७३४ फलकच यामध्ये आहेत. त्यामुळे जाहिरात विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांनी ९ प्रभाग समित्यांना पत्र देऊन, अनधिकृत फलकांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत.


वसई-विरार महापालिका क्षेत्रात जाहिरात फलक लावण्यासाठी मनपाच्या जाहिरात विभागाकडून परवानगी दिली जाते. जाहिरात फलकाची साईज, फलक लावण्याचा कालावधी, ठिकाण अशा अनेक बाबींवर आधारित प्रति चौरस मीटरचा दर आकारून अशी परवानगी दिली जाते. महापालिकेची परवानगी न घेता, शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावल्यास दंडात्मक कारवाई करण्यासोबतच शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद नियमात आहे.


दरम्यान, वसई विरार महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे. लाखोंची लोकसंख्या असलेल्या या कार्यक्षेत्रात विविध नामांकित कंपन्यांची जाहिरात फलक लावण्यासाठी चढाओढ असते. त्याचप्रमाणे विविध छोट्यामोठ्या बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर जाहिरात फलक लावण्यासाठी जाहिरातदारांची नेहमीच गर्दी असते. मात्र महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक लावणाऱ्यांचा आकडा मोठा असल्याचे शहरात दिसत असलेले जाहिरात फलक आणि महापालिकेकडून घेण्यात आलेल्या परवानगीवरुन दिसून येते.


दरम्यान, महापालिकेचे जाहिरात विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांनी ९ प्रभाग समिती सहायक आयुक्तांना प्रभागातील अधिकृत जाहिरात फलकांची यादी पाठवून त्या यादीनुसार अनधिकृत जाहिरात फलक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अनाधिकृत जाहिरात फलकांच्या माहितीचा अहवाल तात्काळ सादर करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

प्रभाग समितीच्या रचनेत ‘बविआ’ची बाजी

नियमांच्या गणितात केवळ एक समिती भाजपकडे  विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्यांची रचना

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई