आजच्याच दिवशी ७५ वर्षांपूर्वी झाला होता मोठा विमान अपघात, समुद्रात पडले होते विमान

मुंबई: गुजरातच्या अहमदाबाद एअरपोर्टजवळ विमान अपघाताच्या ठिकाणी धुराचे लोळ आणि अपघाताची दृश्ये ही हृदय हेलावून टाकणारी आहेत. अहमदाबाद येथून लंडन जात असलेल्या विमानात २४२ जण प्रवास करत होते. यात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते. या अपघातात एक व्यक्ती जिवंत असल्याचे समोर आले आहे तर मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे.


अहमदाबादमध्ये आज म्हणजेच १२ जून २०२५ला अहमदाबाद येथून लंडनला जात असलेल्या प्लेन टेक ऑफ सोबत क्रॅश झाले. या भीषण विमान अपघाताने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. आजपासून ७५ वर्षांआधी म्हणजेच १२ जून १९५०च्या जवळ भारतापासून ३ हजार किमी दूर असाच एक विमान अपघात घडला होता.


एअर फ्रान्सचे एक विमान डगलस डीसी ४ विमान बहरीन विमानतळावर लँड करत असताना समुद्रात जाऊन पडले. या अपघातात ४६ लोक मारले गेले होते. एअर फ्रान्सचे विमान सायगॉन येथून पॅरिसच्या दिशेने जात होते. यातच पाकिस्तानच्या कराची एअरपोर्टवर विमान थांबले होते. विमानने संध्याकाळी ४ वाजता पाकिस्तानच्या बहरीन येथेून उड्डाण केले.


रात्री ९ वाजता साधारण विमानाने बहरीन एप्रोच कंट्रोलला फोन करून त्याची उंची ६५०० फूट सांगितली आणि उतरण्याची परवानगी मागितली. एप्रोच कंट्रोलने २००० फूट खाली उतरण्यास परवानगी दिली. यानंतर विमान हवाई क्षेत्रापासून वर साधारण १००० फूट उंचावर आले. विमानाला आपली स्थिती पाहता पुन्हा उतरण्याची सूचना देण्यात आली. टॉवर कंट्रोलने स्वीकार केले आणि रनवेवर उतरण्याची परवानगी दिली.



समुद्रात लँड झाले विमान


यानंतर एअर फ्रान्सचे विमान समुद्रात पाण्याला टक्कर देत अपघातग्रस्त झाले. एअर फ्रान्स डगलस डीसी ४ विमान बहरीन विमानतळाच्या जवळील समुद्रात पडले. यात ४६ जणांचा मृत्यू झाला. केवळ ६ जण यातून बचावले.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या