चमत्कार, Air India अपघातातून सीट 11A वरील प्रवासी वाचला

  297

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी Air India च्या बोईंग 787-8 Dreamliner विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात बहुतांश प्रवाशांचा मृत्यू झाला असला तरी, सीट क्रमांक 11A वर बसलेले रमेश विश्वासकुमार (४०) हे एकमेव वाचलेले प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.


रमेश यांनी सांगितले की, टेकऑफनंतर अवघ्या ३० सेकंदांत मोठा आवाज झाला आणि विमान कोसळलं. सगळं इतक्या झपाट्याने घडलं की काहीच कळायच्या आत मी धडकलो. डोळे उघडले तेव्हा आजूबाजूला मृतदेह होते, मी घाबरलो. मी उठलो आणि धावत सुटलो. कुणीतरी मला उचलून रुग्णवाहिकेत टाकलं आणि इथे रुग्णालयात आणलं.



छाती, डोळे आणि पायांवर गंभीर दुखापत झाली असली तरी रमेश सुरक्षित आहेत. ते सध्या अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सामान्य वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. त्यांनी सांगितलं की, त्यांचा भाऊ अजय कुमार रमेश (४५) हेही त्याच विमानात होते, पण ते वेगळ्या सीटवर बसले होते. आम्ही दोघं काही दिवस भारतात होतो. दिव येथे गेलो होतो. अपघातानंतर अजूनही माझा भाऊ सापडलेला नाही. कृपया त्याचा शोध घ्या, अशी भावनिक विनंती त्यांनी केली.


विमानात एकूण २४२ जण होते. त्यापैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक होता. विमानाने दुपारी १.३९ वाजता झेप घेतली होती आणि काही मिनिटांतच ते कोसळून आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं.


दुसरीकडे, रुग्णालयात अनेक प्रवाशांच्या नातेवाईकांनी आपल्या प्रियजनांचा शोध सुरू ठेवला आहे. त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता. त्यांचे माजी सहकारी शैलेश मंडलिया यांनी रुग्णालयात येऊन माहिती घेतली आणि सांगितलं, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. काही माहिती मिळाल्यास कळवा. हा अपघात अत्यंत भीषण होता आणि या घटनेने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाचलेले काही मोजके प्रवासीच आता संपूर्ण घटनेचा जिवंत साक्षीदार आहेत.

Comments
Add Comment

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या