अहमदाबाद : शिकाऊ डॉक्टरांनी मारल्या इमारतीतून उड्या

हॉस्टेलवर विमान कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ


अहमदाबाद : गुजरातच्या अहमादाबाद येथे आज, गुरुवारी एअर इंडियाचे विमान बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयावर कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ झाला. यावेळी वसतीगृहातील अनेक विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी उड्या घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.


एअर इंडियाचे विमान हॉस्टेलवर कोसळल्यामुळे १५ ते २० शिकाऊ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. यासंदर्भात प्रशासनाकडून अद्याप कुठलेही अधिकृत वक्तव्य किंवा आकडा जारी करण्यात आलेला नाही. परंतु, अपघातानंतर इमारतीला आग लागल्यामुळे जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी खिडकीतून खाली उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


यासंदर्भात एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाने जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या माळ्याहून खाली उडी मारली. यात त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. अजूनपर्यंत मुलाला भेटता आले नसून त्याच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे त्याच्या आईने स्पष्ट केले. दरम्यान बिघाडानंतर एअर इंडियाच्या विमानाचा काही भाग हॉस्टेलच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला धडकला. यात इमारतीचे भीषण नुकसान झाले असून इमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे का याबाबत अद्याप स्थानिक प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नाही.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या