Ahmedabad Plane Crash : मेडिकल कॉलेजवर कोसळलं विमान; जेवतानाच विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

  165

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोईंग 787-8 विमानाला मोठा अपघात झाल्यानं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. हे विमान टेकऑफदरम्यान कोसळून थेट बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर आदळलं. त्यावेळी विद्यार्थी मेसमध्ये जेवत असताना हा थरारक क्षण घडला आणि काळाने थेट त्यांच्या दारात हजेरी लावली.


या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या जवळपास २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, विमानातील ११० प्रवासीही मृत्युमुखी पडल्याची भीती आहे. मात्र, अद्याप या आकड्यांची अधिकृत घोषणा झालेली नाही.



अपघाताचा भयावह क्षण…


दुपारी १:३८ वाजता एआय 171 फ्लाइट अहमदाबादहून लंडनकडे रवाना झाली होती. काही वेळातच टेकऑफदरम्यान विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, विमानाच्या मागच्या भागाने झाडाला धडक दिली आणि नंतर ते पेट घेत थेट मेडिकल वसतिगृहावर कोसळलं.



या इमारतीतच बी.जे. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी राहतात आणि त्यांची मेस देखील तिथेच आहे. जेवणाच्या वेळेसच ही दुर्घटना घडल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाल्याची शक्यता आहे.



विमानातील प्रवाशांची माहिती :


विमानात एकूण २४२ प्रवासी होते, त्यापैकी १२ क्रू मेंबर्स होते. उर्वरित २३० प्रवाशांपैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनडाचा प्रवासी होता.



ब्रिटन सरकारचा मदतीचा हात


ब्रिटिश सरकारने अपघातग्रस्त प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन सुरू केली असून, 1800 5691 444, 011-24610843, आणि 9650391859 या क्रमांकांवर संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे.

Comments
Add Comment

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा