प्रभाग रचनेच्या कामांमध्ये दबाव टाकल्यास होणार कारवाई

प्रारूप प्रभाग रचनेबाबत मुंबई महापालिकेला दिले आदेश


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबत राज्याच्या नगरविकास खात्याने संबंधित महापालिकांना आदेश जारी करत सार्वत्रिक निवडणूक तत्काळ घेणे अवश्य असल्याने यासंदर्भातील प्रभाग रचना करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. या संदर्भात मुंबई महानगर पालिकेलाही प्रभाग पुनर्रचना करण्याचे निर्देश दिले आहे.


त्यानुसार प्रभाग रचनेचा प्रारुप बनवताना अत्यंत गोपनीय बनवले जावे. प्रभाग रचनेची माहिती ही सर्वसामान्य नागरिकांना प्रारूप प्रसिद्धीच्या वेळी प्रथम कळते, पण त्यापूर्वी राजकीय व्यक्ती, प्रसिद्धी माध्यमे अथवा अन्य व्यक्तींना याची माहिती देता येणार नाही तसेच प्रभाग रचनेच्या कामांमध्ये असणाऱ्या संबंधितांवर दबाव टाकता येईल. जर तसे झाल्यास संबंधितांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.


मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्राप्त झालेल्या प्रचाग रचना २०२५च्या संदर्भातील सर्व अधिकारी महापालिका आयुक्तांना प्रदान करण्यात आली आहे. निवडणुकीकरता प्रभाग रचना ही शासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करावयाची आहे असे नमुद केले आहे.


मुंबईतील २२७ प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाची मान्यता महापालिका आयुक्त घेतील आणि या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयुक्त मान्यता देतील. प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध केल्यानंतर यावरील आधारीत प्राप्त हरकती व सूचनांवर राज्य शासनाने नेमलेले अधिकारी हे
सुनावणी घेतील.


या प्रारूप प्रभाग रचनेच्या सुनावणीनंतर राज्य निवडणूक आयुक्तांनी या अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर महापालिका आयुक्त हे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील असे नमूद केले आहे.सन २०११च्या जनगणनेनुसार मुंबई महापालिका हद्दीतील प्रगणक एकूण लोकसंख्या,अनुसूचित जातीची आणि जमातीची लोकसंख्या, प्रगणक गटाचे नकाशे आणि घरयादी ही जनगणना कार्यालयाकडून उपलब्ध करून केली जाणार आहे. पण प्रभागातील मतदार संख्या अथवा सध्याची रहिवाशांची संख्या विचारात घेता येणार नसून याचा प्रभाग रचनेशी कसलाही संबंध नसेल असेही नमुद केले आहे. प्रभागाची लोकसंख्या ही त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के जास्त किंवा १० टक्के कमी अशाप्रकारे मर्यादीत ठेवत रचना करता येणार आहे.


प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, रेल्वे रुळ, उड्डाणपूल इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करावी. पण कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आदेशात म्हटले आहे.


मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजेत. प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही याचीही दक्षता घ्यावी. शिवाय रस्ते, रेल्वे, नाले, नद्या, सिटी सर्वे क्रमांक यांचा उल्लेख केला जावा असेही नमुद केले आहे.

Comments
Add Comment

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर

मालाडमधील फोर डायमेंशन इमारतीला आग

मुंबई: मालाड पश्चिम येथील माइंडस्पेसजवळ लिंक रोडवरील फोर डायमेंशन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी आग लागली. मुंबई

मुंबईच्या काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार!

प्रेमभंगातून तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, नंतर स्वतः केली आत्महत्या मुंबई : मुंबईतील काळाचौकी भागात एक खूप

हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी

मुंबईतील स्ट्रीट फर्निचरच्या कंत्राट कामांना बोनस, आणखी वाढवून दिली एवढ्या कोटींची रक्कम

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या प्रशासकांच्या काळात मंजूर झालेल्या वादग्रस्त स्ट्रीट फर्निचरची कामे