शुभांशू शुक्ला यांचे उड्डाण पुन्हा पुढे ढकलले, Axiom-4मिशन लाँचिंगची तारीख लवकरच होणार जाहीर

नवी दिल्ली: भारताच्या हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठीचे मिशन Axiom-4 हे पुढे ढकलण्यात आले आहे. काही तांत्रिकी कारणामुळे Axiom-4चे लाँचिंग पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. लवकरच लाँचिंगची तारीख जाहीर केली जाणार आहे.

याआधी हे उड्डाण खराब हवामानामुळे १० जूनच्या ऐवजी ११ जूनला होणार होते. संध्याकाळी ५.३० हे उड्डाण होणार होते. मात्र हे उड्डाण पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे.

 



भारतीय हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला तीन इतर क्रू मेंबर्ससोबत स्पेस मिशन, Axiom-4 चा भाग बनण्यासाठी तयार आहे. हे मिशन म्हणजे भारतासाठी एक मैलाचा दगड ठरेल. Axiom-4मिशनची क्रू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा प्रवास करणार आहे. १४ दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. यात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील वैज्ञानिक प्रयोग, शैक्षणिक प्रसार आणि व्यावसायिक उपक्रमांबाबत संशोधन होणार आहे.

मिशन अ‍ॅक्सिओम स्पेसच्या 'Axiom-4' मोहिमेअंतर्गत लाँच केले जाईल. ज्याला 'मिशन आकाश गंगा' असेही म्हटले जात आहे. Axiom-4 (अ‍ॅक्स-४) मध्ये,चार देशांचे चार अंतराळवीर १४ दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत.शुभांशू हे आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. यापूर्वी राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळ यानातून अंतराळात प्रवास केला होता.

Axiom-4 मोहिमेच्या क्रूमध्ये भारत, पोलंड आणि हंगेरीतील सदस्यांचा समावेश आहे. १९७८ नंतर अंतराळात जाणारे स्लावोज उझनान्स्की हे पोलंडमधील दुसरे अंतराळवीर असतील. १९८० नंतर अंतराळात जाणारे टिबोर कापू हे हंगेरीचे दुसरे अंतराळवीर असतील. तर अमेरिकेच्या पेगी व्हिटसनची ही दुसरी व्यावसायिक मानवी अंतराळ उड्डाण मोहीम आहे.
Comments
Add Comment

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले