रोहित शर्माच्या वनडे कर्णधारपदाला धोका?

मुंबई: रोहित शर्माने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना त्याच्या चाहत्यांना मैदानावर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयला रोहित शर्मा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेईलं असं वाटत होतं. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माने अशी कुठलीही घोषणा केली नाही.


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर त्यांनी २०२५ चा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपदही पटकावलं होतं. रोहितकडे वनडे क्रिकेटमधील विश्वचषक ट्रॉफी नाही. २०२३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली तो भारतासाठी ही ट्रॉफी मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण तो यशस्वी झाला नाही. अशा परिस्थितीत रोहितचे लक्ष्य २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे.


सध्या भारतीय संघात अनेक बदल होताना दिसत आहेत. विराट कोहली आणि रोहित यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. दोघेही फक्त एकदिवसीय सामने खेळतात. भारताकडे टी-२० मध्ये पूर्णपणे नवीन संघ तयार आहे, ज्याचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. शुभमन गिलला कसोटीत कर्णधारपद मिळाल्यानंतर एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे. आता फक्त वनडे सामन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.


रोहित आणि विराट दोघांचेही लक्ष २०२७ मध्ये होणाऱ्या विश्वचषकावर आहे. तथापि, हे दोघेही संघात स्थान मिळवू शकतात की नाही हे पाहणे बाकी आहे कारण वय दोघांच्याही मार्गात एक मोठा अडथळा आहे. रोहित आता फक्त एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन त्याला विश्वचषकात घेण्याचा विचार करत आहे का ते पाहणं महत्त्वाचं ठरणर आहे. आणि याचे सर्वात मोठे कारण त्याचे वय आहे. २०२७ पर्यंत रोहित ४० वर्षांचा होईल. रोहित नक्कीच खेळू इच्छित असेल, परंतु संघ व्यवस्थापनाचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अनेक वेळा संदेश दिला आहे की, ते एक नवीन संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत ज्यामध्ये तरुणांचा समावेश असेल जेणेकरून त्यांना महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धांपर्यंत चांगला अनुभव मिळेल.

Comments
Add Comment

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित